दूधगंगा नदीवरील दत्तवाड बंधारा तिसऱ्यांदा पाण्याखाली

दत्तवाड / प्रतिनिधी 

दत्तवाड (ता.शिरोळ) येथील दूधगंगा नदीवरील महाराष्ट्र कर्नाटकला जोडणारा दत्तवाड एकसंबा बंधारा चालू वर्षी तिसर्‍यांदा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या बंधार्‍यावरून महाराष्ट्र कर्नाटक या दोन्ही राज्यातून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.

 

गेल्या चार ते पाच दिवसापासून सर्वत्र सुरू असलेल्या संततदार पावसामुळे दूधगंगा नदीचे पाणी वाढले असून नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीचे पाणी वाढल्याने दत्तवाड एकसंबा बंधारा चालू पावसाळ्यात तिसर्‍यांदा पाण्याखाली गेले आहे. ऑगस्टच्या सुरुवातीपासून पंधरा ते वीस दिवस पावसाने बर्‍यापैकी उघडीप घेतल्याने दूधगंगा नदीचे पाणी पूर्णपणे पात्रात गेले होते. मार्च एप्रिल मध्ये असणार्‍या उन्हाप्रमाणे ऑगस्टमध्ये ही उन्हाळा जाणवत होता.

 

त्यामुळे शेतीसाठी पाण्याची गरज भासू लागल्याने अनेक शेतकर्‍यांनी आपली पाण्याची विद्युत मोटारी पुन्हा जोडू लागले होते. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने नदीचे पाणी वाढले आहे.

Spread the love
error: Content is protected !!