मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी पालकांच्यात जागरूकता आवश्यक – डॉ.अनिकेत कुंभोजकर

मातोश्री चिल्ड्रन्स क्लिनिक व रोटरी क्लब हेरिटेज सिटी आयोजित आरोग्य शिबीर उत्साहात

शिरोळ / प्रतिनिधी 

लहान मुलांना बोलता येत नाही यावेळी त्यांच्या आरोग्याच्या तक्रारीचे निरसन करताना बालरोगतज्ञांना मोठ्या आव्हानास सामोरे जावे लागत असते आपली मुलं सुदृढ राहण्यासाठी त्यांच्या आरोग्याविषयी पालकांच्यातही जागरूकता असणे आवश्यक आहे असे विचार प्रसिद्ध डॉ अनिकेत कुंभोजकर यांनी व्यक्त केले.

 

येथील मातोश्री चिल्ड्रन्स क्लिनिकच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त मातोश्री चिल्ड्रन्स क्लिनिक आणि रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी यांच्यावतीने लहान मुलांच्या आरोग्य तपासणीचे शिबीर आयोजित करण्यात आले होते.या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून कुंभोजकर हे बोलत होते.

 

रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सेक्रेटरी प्रा के एम भोसले यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले.मातोश्री चिल्ड्रन्स क्लिनिकचे प्रमुख डॉ अतुल पाटील यांनी प्रास्ताविक करत असताना आपल्या हॉस्पिटलच्या प्रगतीचा आढावा घेत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमाचीही माहिती दिली.

 

डॉ.अनिकेत कुंभोजकर यांनी लहान मुलांचे तपासणी करून त्यांच्या पालकांना औषधोपचारासंदर्भात मार्गदर्शन केले.याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष तुकाराम पाटील (भैय्या), इव्हेंट चेअरमन उल्हास पाटील, संस्थापक अध्यक्ष संजय पाटील (माऊली), सदस्य संजीव पुजारी,राहुल यादव, डॉ.अरविंद माने,संजय तुकाराम शिंदे,सुरेश देशमुख,अमित जाधव यांच्यासह सर्व सदस्य शिवाजीराव पाटील,

 

 

अमोल पाटील, प्रमोद पाटील, सौ तृप्ती पाटील, चित्रलेखा पाटील यांच्यासह परिसरातील मान्यवर प्रतिष्ठित नागरिक व आरोग्य शिबीरासाठी उपस्थित असणारे बालक व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे ट्रेझरर चंद्रकांत भाट यांनी आभार मानले.

Spread the love
error: Content is protected !!