कोलकत्ता येथील गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याची मागणी
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ शहर डॉक्टर्स असोसिएशनच्यावतीने कोलकत्ता येथे घडलेल्या अमानुष कृत्याचा निषेध करून गुन्हेगारांना कठोर शासन करण्याच्या मागणीचे निवेदन शिरोळ तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यास देण्यात आले आहे तसेच शनिवारी सर्वच डॉक्टरांनी दिवसभर आपले दवाखाने बंद ठेवून या घटनेचा निषेध केला.
कोलकाता येथील आरजीकार मेडिकल कॉलेजमध्ये शिकावू डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून केला या झालेल्या भीषण गुन्ह्याचा तीव्र निषेध करत असून जिथे एका तरुण वैद्यकीय विद्यार्थिनीवर क्रूरपणे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती.
या घृणास्पद कृत्याने केवळ वैद्यकीय क्षेत्रालाच हादरवून सोडले नाही तर संपूर्ण देशच हादरले आहे. हा क्रूर गुन्हा विद्यार्थ्यांसाठी सुरक्षितता आणि सुरक्षिततेच्या समस्यांवर लक्ष देण्याची तातडीची गरज अधोरेखित करतो, विशेषतः ज्या वैद्यकीय संस्थांमध्ये विद्यार्थी समाजसेवेसाठी आपले जीवन समर्पित करतात.
अशा घटना केवळ वैयक्तिक हक्कांचे उल्लंघन करत नसून मानवी जीवनाचा सन्मान राखण्यासाठी झटणाऱ्या संपूर्ण वैद्यकीय समुदायावर हल्ला आहे. या घटनेचा शिरोळ डॉक्टर आसोसिएशन यांच्यावतीने तीव्र निषेध करत असून. या प्रकरणातील दोषींवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली.
या घटनेचा निषेध म्हणून शनिवारी दिवसभर शहरातील सर्वच डॉक्टरांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वैद्यकीय सेवा पूर्ण दिवस बंद पाळण्यात आला.
सदरचे निवेदन तहसील कार्यालयातील वरिष्ठ लिपिक हंगे व शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने यांना देण्यात आले.
शिरोळ डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ विरश्री पाटील बोलताना म्हणाल्या की कोलकत्ता येथील शिकाऊ डॉक्टर तरुणीवर अमानुषपणे अत्याचार करून तिचा निर्गुघपणे खून केला ही घटना देशाला कलंकित करणारी ठरली आहे.आज समाजात वावरत असताना स्त्रियांच्या सुरक्षेतेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
यामुळे कोलकत्ता येथील घटनेचा निषेध करण्यासाठी शिरोळ शहरातील सर्वच डॉक्टरांनी आज एक दिवस आपली वैद्यकीय व्यवसाय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी त्यांनी केली.
निवेदन देताना शिरोळ डॉक्टर असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ अमेय माने, सेक्रेटरी डॉ महेश बन्ने सदस्य डॉ वैभव हुग्गे ,डॉ रवी फल्ले,डॉ सतीश कुंभार,डॉ अनिरुद्ध सुतार ,डॉ राजू पाटील,डॉ प्रिन्सकुमार रजपूत, डॉ किशोर खामकर,डॉ सुरेश शेलार, डॉ अमोल पाटील,
डॉ सुशांत पाटील ,डॉ अमरसिंह माने देशमुख ,डॉ अतुल पाटील, डॉ अमृता कोरे,डॉ सरला माने, डॉ अश्विनी पाटील,डॉ शुभांगी सुतार , डॉ प्रिया खामकर,डॉ शन्नू पाटील ,डॉ अनिता माने देशमुख ,डॉ पल्लवी हुग्गे,डॉ पायल माने यासह शिरोळ डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.