स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पुलाची शिरोली / कुबेर हंकारे

शिरोली, नागाव, मौजे वडगाव येथे स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक व सहकारी संस्थांमध्ये भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पुलाची शिरोली ग्रामपंचायतीच्या वतीने भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच सौ. पद्मजा करपे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते पूजन करण्यात आले छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ पुतळ्यास महादेव सुतार व आरिफ सर्जेखान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिलाफलक पुष्पहार श्रीकांत कांबळे व महमद महात यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. ध्वजारोहण सरपंच सौ. पद्मजा करपे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते वह्यांचे वाटप तसेच विविध कार्यक्रम पार पाडले.

 

याप्रसंगी सरपंच सौ. पद्मजा करपे,उपसरपंच बाजीराव पाटील ग्रामविकास अधिकारी ए. वाय. कदम , सुजाता पाटील, मनिषा संकपाळ, हर्षदा यादव, नजिया देसाई, वसिफा पटेल,मंगल शिंदे, योगेश खवरे, सागर कौंदाडे,शक्ती यादव, बाळासो पाटील, विजय जाधव ,श्रीकांत कांबळे,महमद महात,आरिफ सर्जेखान, सतीश पाटील, राजेश पाटील,शिवाजी समुद्रे यांचेसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

 

मौजे वडगाव ग्रामपंचायत ध्वजारोहन सरपंच सौ. कस्तुरी पाटील यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी यावेळी माजी उपसरपंच सुनिल खारेपाटणे, सुरेश कांबरे , ग्रा.पं. सदस्य स्वप्नील चौगुले, नितिन घोरपडे ,सविता सावंत , सुनिता मोरे, सुवर्णा सुतार,दिपाली तराळ, मधुमती चौगुले, मिनाक्षी आकिवाटे , ग्रामसेविका भारती ढेंगे – पाटील आदी उपस्थित होते.

 

नागाव ग्रामपंचायत ध्वजारोहन सरपंच सौ. विमल शिंदे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच उत्तम सावंत, उपसरपंच सुधीर पाटील, अभिनंदन सोळांकूरे, अमित खांडेकर,श्रेयस नागावकर, अजित घाटगे, अक्षय कांबळे, सागर गुडाळे, कुमार राठोड,अश्विनी पाटील, मनीषा पाथरे, मौसमी कांबळे, अश्विनी माळी, शुभांगी पवार, संगीता कोळी, मंगल चव्हाण, संगीता वायदंडे,, सुलोचना कांबळे,ग्रामविकास अधिकारी विठ्ठल कांबळे यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

 

शिरोली विकास सेवा सोसायटीचा ध्वजारोहन चेअरमन धनाजी पाटील यांचे हस्ते करण्यात आले व्हाईस चेअरमन मदन संकपाळ यांनी ध्वज पूजन केले याप्रसंगी संस्थेचे सर्व संचालक मंडळ सचिव नंदकुमार पाटील व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

शिरोली हायस्कूल व संकल्प विद्या मंदिरच्या प्रांगणामध्ये उत्साहात संपन्न झाला. ध्वजारोहण शिक्षण प्रसारक मंडळचे चेअरमन सुरेशराव पाटील यांचे हस्ते करण्यात आले. तुकाराम गावडे यांनी वॉटर फिल्टर प्रदान केला. राष्ट्रसेवा वाचनालयाकडून गरजू विद्यार्थ्यांना वह्या देण्यात आल्या.

 

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक एम. एस. स्वामी यांनी ब्रिटिशांच्या राजकीय गुलामगिरीतून अनेक क्रांतिकारकांनी बलिदान देऊन आपल्या सर्वस्वाचा त्याग करून हे स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. आपण राष्ट्रभक्ती, देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, मानवता ही मूल्ये रुजवूया असे सांगितले.
या कार्यक्रमास संस्थेचे सेक्रेटरी कृष्णात खवरे , अध्यक्ष सलीम देसाई व संस्थेचे पदाधिकारी, संकल्पच्या मुख्याध्यापिका सौ.अश्विनी यादव, पालक ,ग्रामस्थ, माजी विद्यार्थी सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. एम. मारापुरे यांनी केले. तर आभार शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. एस. एस. गाडेकर यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन जिमखाना विभाग प्रमुख आर. एस. पाटील यांनी केले.

 

आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये प्रमुख पाहुणे सौ. डॉ.रेवती पाटील यांच्या हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहन डॉ. फारूख देसाई यांचे हस्ते करण्यात आले.सूत्रसंचालन सोनाली मगदूम यांनी केले.या कार्यक्रमासाठी शाळेचे संस्थापक अध्यक्ष आर. एस.पाटील सेक्रेटरी दिपक पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्राथमिक मुख्याध्यापक आर.जी.कुंभार, माध्यमिक मुख्याध्यापिका सौ.डी.एस.वडंकर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक उपस्थित होते.

 

ट्विंकल स्टार इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये ध्वज पूजन विजय पोवार यांचे हस्ते व ध्वजारोहन शिवाजी पोवार पाटील यांचे हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष संतोष बाटे यांनी केले. याप्रसंगी सौ. मनिषा बाटे, सौ. प्रतिक्षा पाटील , नितीन दळवी,तात्यासो गायकवाड, बाबूराव चौगले,विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

 

कौतुक विद्यालय येथे संपादक वसंत भोसले यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले, ध्वज पूजन शास्त्रज्ञ बी.एच.पाटील यांनी केले. याप्रसंगी विश्वास पोवार, बाळासो शिंदे,संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक , प्रतिष्ठीत नागरिक व कर्मचारी उपस्थित होते.

 

शिरोली एम आयडीसी पोलिस ठाण्यात सपोनि पंकज गिरी व पोलिस कर्मचारी यांचे उपस्थितीत तर शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मँक) मध्ये अध्यक्ष सुरेंद्र जैन ,उपाध्यक्ष जयदीप चौगुले, खजानिस बदाम पाटील यांच्यासह संचालकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.

Spread the love
error: Content is protected !!