वाद सोडण्यासाठी आलेल्या तिघांना कोयत्याने वार

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

वाद सोडण्यासाठी आलेल्या तिघांना कोयत्याने वार करून दोघेजण गंभीर जखमी.तर अन्य दोघांना लाथा बुक्यांनी मारहाण करून जखमी केले.यामध्ये जठारवाडी ता.करवीर येथील ग्रामपचायतीचे माजी सरपंच नंदकुमार वसंत खाडे वय वर्ष ४६, व त्यांचा मुलगा दिग्विजय नंदकुमार खाडे, स्नेहांकिता नंदकुमार खाडे व सौरभ अशी जखमींची नावे आहेत.ही घटना बुधवारी दिनांक १४ रोजी रात्री आठ वाजता जठारवाडी येथे घडली.या घटनेची फिर्याद शुक्रवारी उशिरा शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात नंदकुमार खाडे यांनी दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिग्विजय खाडे यांचा मेव्हणा सौरभ व आरोपी यांचेत वाद होवून मारहाण सुरू होती. हा वाद सोडवण्यासाठी नंदकुमार खाडे व त्यांचा मुलगा दिग्विजय हे दोघेजण गेले होते. सदर आरोपींनी त्यांनाही महाराणा सुरू केली.यात यातील एका आरोपीने नंदकुमार खाडे यांच्या डोक्यात कोयत्याने मारत असताना दिग्विजय हा सोडवण्यासाठी गेला असता त्याच्या हातावरही कोयत्याचा वार लागून गंभीर जखमी झाला आहे. दिग्विजय याच्यावर कोल्हापुरातील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.तर नंदकुमार खाडे यांच्यावर सरकारी दवाखान्यात उपचार करण्यात आले.यामध्ये नंदकुमार खाडे यांचा दुसरा मुलगा स्नेहांकित यालाही सदर आरोपीने लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले आहे.या मारामारीत खाडे यांची गळ्यातील सोन्याची चेन गहाळ झाली आहे. या बाबत संग्राम प्रकाश जाधव, प्रकाश काळू जाधव ,महेश जनार्दन जठार ,गणेश जनार्दन जठार,युवराज शिवाजी जाधव,सुनील युवराज जाधव या सहा जणांच्या विरोधात शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सपोनि पंकज गिरी हे करीत आहेत.
Spread the love
error: Content is protected !!