शेडशाळ येथील प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद
शिरोळ : प्रतिनिधी
सबका साथ सबका विकास ही विचारधारा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेली दहा वर्षे देशाच्या प्रगतीसाठी झटत आहेत शेतकरी कष्टकरी आणि सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताची धोरण राबवत त्यांचे जीवनमान उंचाविण्याचे काम त्यांनी केले आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली खासदार धैर्यशील माने यांनी मतदार संघात विकासाची गंगा आणली यामुळे हजारो कोटी रुपयांची विकास कामे झाली आहेत.
देशाला सक्षम नेतृत्व हवे असल्याने नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष आणि शिरोळचे माजी नगरसेवक डॉ अरविंद माने शेडशाळ येथे केले.
महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ शेडशाळ (ता शिरोळ) येथे प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी नगरसेवक डॉ अरविंद माने हे बोलत होते ते पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खासदार धैर्यशील माने यांनी सुमारे आठ हजार दोनशे कोटी रुपयांची विकास कामे हातकलंगले लोकसभा मतदारसंघात केली आहे.आपल्या मतदारसंघात विकासाभिमुख नेतृत्वाची गरज असल्यामुळे पुन्हा एकदा खासदार धैर्यशील माने यांना खासदार करण्याची गरज आहे.त्यामुळे महायुतीच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन महायुतीचा जाहीरनामा व धनुष्यबाण प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवून खासदार धैर्यशील माने यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.या प्रचार फेरीला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भारतीय जनता पार्टी जैन प्रकोटचे सहसचिव व जिल्हा चिटणीस महावीर तकडे, भाजपा ओबीसी सेल शिरोळ तालुकाध्यक्ष सदाशिव आंबी, माने गटाचे गौस पाथरवट, कलाप्पा कांबळे, अशोक सूर्यवंशी,अविनाश तकडे, अवी शहापुरे,अवि कोल्हापूरे,सुरेश नायकवडे,साहेब पाथरवट, विजय कोळी, भरत लाड, दादा कडोळी, शिवाजी सूर्यवंशी, रोहन साजणे, अमर नाईक, चेतन नाईक यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने या प्रचार फेरीत सहभागी झाले होते.