नागाव येथे महिलेचे तोंड दाबून तिच्या गळ्यास धारदार चाकू लावून जीव मारण्याचा प्रयत्न

सिमेंट खरेदीच्या बहाणाने आलेल्या दोन अनोळखी व्यक्तीनी महिलेच्या गळ्यातील चेन स्कॅचिंग करण्याच्या नादात महिलेचे तोंड दाबून तिच्या गळ्यास धारदार चाकू लावून जीव मारण्याचा प्रयत्न केला
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
नागाव येथे सिमेंट खरेदीच्या बहाणाने आलेल्या दोन अनोळखी व्यक्तीनी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील चेन स्कॅचिंग करण्याच्या नादात महिलेचे तोंड दाबून तिच्या गळ्यास धारदार चाकू लावून जीव मारण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला याच महिलेवर दीड महिन्यात दुसऱ्यांदा झाला तर पळून जाताना तुचे अपहरण करून ठार मारण्याचे धमकी दिली.नागाव ता हातकणंगले येथील ग्रामपंचायती शेजारी राहणारे कोळी कुटुंबीय याचा सिमेंट विक्रीचा व्यवसाय असून आज दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास सिमेंट खरेदी करण्याचा बहाणा करून एका अनोळखी लहान मुलास दहा रुपये देवून सिमेंट आणण्यास सांगितले पण महिलेने सिमेंट १५ रुपये किलो असल्याचे सांगून ५ रूपये घेवून येण्यास  त्या मुलास सांगितले व मुलास परत पटवून दिले त्यानंतर त्या अनोळखी दोन व्यक्तींनी कोळी त्याच्या घरी व आसपास कोणी नसल्याचा फायदा घेत महिलेच्या घरी घुसून तीच्या गळ्यास मनी मंगळसुत्र हिसकावून नेत असताना त्या महिलेने आरडा ओरडा करायला सुरूवात केल्यावर  तिचे तोंड दाबून तिच्या गळ्यास धारदार चाकू लावून ठार मारण्याची धमकी दिली .  प्रसंगावधान राखत महिलेने आपल्या हातातील सिमेंट पोटी उचलणारे हुक त्याच्या पायावर मारल्याने त्या व्यक्तीने त्या महिलेस सोडून दिले या झटापटीत त्या महिलेच्या हातावर चाकू लागल्याने महिला किरकोळ जखमी झाली या झटापटीत महिलेचे गळ्यातील मनी मंगळसुत्र तुटले पण चोरांच्या हाती काहीच लागले नाही . आरडाओरड केल्यावर चोरट्यानी पळ काढला .
         हा हल्ला दीड महिन्यात दुसऱ्यांदा याच महिलेवर झाला होता पहिल्या वेळी १३ जानेवारीत बहुरूपी रूपाने सुरपेटी वाजण्याच्या बहाणाने आलेल्या अनोळखी व्यक्तीनी याच महिलेच्या घरी जाऊन भिक्षा मागण्याचा बहाणा करून चोरीचा प्रयत्न केला होता पण त्यावेळी ही प्रयत्न फसला होता मागिल व आजच्या चोरीच्या उद्देशाने आले चोरटे हे एकच होते असे त्या महिलेने सांगितले हे चोरट्यानी पळून जाताना तु आम्हास ओळखले आहेस त्यामुळे तुझे अपहरण करून जिवे मारण्याची धमकी देवून पोबारा केला असे या महिलेने सांगितले . या  महिलेने आरडा ओरडा केल्याने   नागरिक मोठ्या प्रमाणात जमले व  काही तरुणांनी त्या अज्ञात चोरट्यांचा पाटलाग केला पण ते कोणत्या मार्गाने निघून गेले हे अद्याप ही समजू शकले नाही. या घटनेची नोंद शिरोली पोलिसात रात्री उशिरापर्यंत झाली नाही
Spread the love
error: Content is protected !!