विकसित भारताचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून भारताचे भवितव्य घडवण्याचे काम भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील करत आहे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

विकसित भारताचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून भारताचे भवितव्य घडवण्याचे काम भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील करत आहे , देशाला स्वातंत्र्यप्राप्ती मिळाल्यानंतर काँग्रेसने देशाचा विश्वास घात केला.देशाला अखंड भारत नाही तर खंडित भारत दिला हे काँग्रेसने केलेले फार मोठे पाप आहे.सध्या काँग्रेसने सुरू केलेली भारत जोडो यात्रा ही भारत तोडो नाहीतर भारत तोडो यात्रा सुरू आहे.काश्मीरमध्ये दोन विधान दोन प्रधान दोन निशाण चालणार नाही ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावल्यानंतर काश्मीरमध्ये १९५१ /५२ पासून सुरू झालेला संघर्ष सुरू झालेला संघर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर कलम 370 कलम हटवून हा संघर्ष थांबला असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान यानी शिरोली पुलाची येथे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ता संवाद मेळाव्या दरम्यान बोलताना व्यक्त केले.
यावेळी पुढे बोलतात म्हणाले कि सध्या काश्मीरमध्ये केसरचा सुगंध चारी बाजूंनी दरवळत आहे 2014 पूर्वी हा देश घोटाळ्यांचा देश असा जगात हिणवला जात होता पण मोदींनी हे सर्व चित्र बदलून विकासशिल प्रगतीची गंगा आणल्याने जगामध्ये भारत देशाचे नाव अभिमानाने घेतली जाऊ लागले . मध्य प्रदेश हे राज्य आजारी राज्य होते भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर हे विकसित करण्यात आले देशांमध्ये सर्वात जास्त गहू उत्पादन घेणारे राज्य म्हणून आज नावलौकिकास आले आहे जनतेची सेवा म्हणजेच देवाची पूजा आहे आज मध्य प्रदेश मध्ये प्रत्येक मुलीचं लग्न सरकार करते मुख्यमंत्री कल्याण योजनेतून लाखो रुपये आज महिलांच्या नावावर त्यांच्या बँक खात्यात जमा होते . लाडली लक्ष्मी योजना ही देशभर प्रसिद्ध झाली ही योजना लाडली लक्ष्मी बेटी लखपती बेटी या योजनेमुळे मध्य प्रदेश मध्ये मुलींचा दर हा 1000 मुलांच्या मागे 976 वर पोहोचला तो पूर्वी 912 असा होता त्यामुळे या योजनेचा प्रभाव अतिशय चांगल्या पद्धतीने मध्य प्रदेश मध्ये झालेला दिसून आला आहे . राज्यातील एक कोटी 32 लाख महिलांच्या खात्यावर योजनेतून पैसा जमा केल्यामुळे त्या महिलांची इज्जत गावामध्ये व घरामध्ये वाढलेली आहे भारतीय जनता पार्टीने आयुष्य बदलण्याचे अभियान सुरू केले असून भारत हा एक दिवस विश्वगुरू नक्कीच बनेल असे मत चौहान यानी केले.यावेळी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक यानी बोलताना म्हणाल्या कि भारतीय जनता पक्षाची संस्कृती व आदेश नेत्यांपासून ते तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पाळला जातो याचे उदाहरण म्हणजे २०२१ साली विधान परिषद निवडणुकीत माजी आमदार अमल महाडिक याना वरिष्ठांच्या आदेशामुळे माघार घ्यावी लागली व प्रतिस्पर्धी उमेदवाराला मदत करण्याचा आदेश दिल्यावर अमल महाडिक यानी मदत करून त्याना बिनविरोध विजयी होण्याची संधी दिली या पक्षाने दिलेला आदेशाचे पालन करण्याची संस्कृती ही येथील नेत्यांपासून ते तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत आहे असे महाडीक यानी सतेज पाटील यांचे नाव न घेता टोला मारला.सुरेश हळवणकर म्हणाले कि मोदींना हटवण्यासाठी एक ही सक्षम नेता विरोधकांच्याकडे नाही देशामधील पंचवीस कोटी गरीब लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणण्याचे काम प्रामुख्याने मोदी सरकारने केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईट का जवाब पत्थर से ही भूमिका ठेवल्याने अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत आज भारताची जगावर धाक आहे प्रो ऊर्जा सारखी योजना गरिबांच्यासाठी आणली असून त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे असे मत हळवणकर यानी केले.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले कि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून कमळ चिन्हावर निवडून जाणारा खासदार असावा अशी मागणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांची आहे सध्या दोन्ही लोकसभा या महायुतीतील आहेत काँग्रेसने देशांमध्ये घोटाळ्यांची शृंखला सुरू ठेवली होती हे गट हे घोटाळे कोट्यावधी रुपयांचे होते एक वेळेला गरिबी हटावचा नाराज देण्यात आला होता पण गरिबी काय हटली नव्हती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दारिद्र्यरेषेखालील 25 कोटी लोकांना वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचे काम केले आहे . देशामध्ये 80 करोड लोकांना मोफत धान्य मिळत आहे . देशामधील शेकडो खेळाडू वेगवेगळ्या प्रकारचे मेडल घेऊन भारतात येत आहेत त्यांना भौतिक सुविधा पुरवण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केला आहे . पुढच्या प्रत्येक शंभर दिवसासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने घरोघरी जाऊन भाजप सरकारच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी असे मत खासदार धनंजय महाडिक यानी केले .
यावेळी भारतीय जनता पक्षाचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यानी आपले मनोगत व्यक्त केलेयावेळी माजी आमदार अमल महाडिक , मकरंद देशपांडे , निशिकांत पाटील , सम्राट महाडिक, राहुल महाडिक, सत्यजित देशमुख, माजी आमदार भगवानराव साळुंखे, अरुणराव इंगवले, लोकनियुक्त सरपंच पद्मजा करपे, अशोकराव स्वामी, सुशांत पाटील , अशोक माने, पुष्पा पाटील , दिपक यादव , माजी उपसरपंच कृष्णात करपे, विठ्ठल पाटील आदिसह उपस्थित होते

Spread the love
error: Content is protected !!