शिरोळ / प्रतिनिधी
विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ आगरभाग शिरोळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर विद्यालयात इयत्ता१० वीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ उत्सहात संपन्न झाला.शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शहाजीराव दाभाडे,सचिव मेजर के.एम भोसले,सौ. फरजाना मुल्ला यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.स्वागत व प्रास्ताविक शिक्षक नितिन बागुल यांनी केले.
वैष्णवी जाधव,यश पोतदार,युसरा मुल्ला,सायली चव्हाण, प्रेरणा पुजारी,अबुबकर सिद्धीक शेख,प्रणाली जठार, हिरकणी कोळी,महेक शेख या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले शिक्षक धनश्री माने,सुप्रिया दाभाडे, पृथ्वीचंद माछरेकर,जयश्री पाटील इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून संस्थेचे सचिव मेजर के.एम.भोसले यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी कष्ट,मेहनत,आत्मविश्वास, वेळेचे नियोजन, वाचन,मनन चिंतन या गोष्टी केल्यास आपल्या ध्येयापर्यंत सहज पोहचता येईल व समाजातील एखादे उच्चस्थ पद ग्रहण करता येईल असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणात शहाजीराव दाभाडे यांनी विद्यार्थ्यांना सर्व प्रथम दहावी बोर्ड परीक्षेला सामोरे जातांना काय केलं पाहिजे तसेच विविध दृष्टांत देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सुत्रसंचालन नितिन बागुल यांनी केले. आभार प्रदर्शन सुप्रिया दाभाडे यांनी केले.शिक्षकेत्तर कर्मचारी सर्जेराव पोवार,सिद्धार्थ कांबळे,अभिषेक ढोकळे यांनी समारंभाचे नियोजन केले.