शरदच्या कृषिदूतांकडून शेतकऱ्यांसाठी माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक

राजापूर येथे शरद कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांकडून शेतकऱ्यांसाठी माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक

राजापूर / प्रतिनिधी

शरद कृषि महाविद्यालय जैनापुर येथील कृषिदूतांनी राजापूर गावांमध्ये त्यांच्या “ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत “शेतीविषयक “माती परीक्षण” या विषयावर प्रात्यक्षिक करून दाखवले.या प्रात्यक्षिकामध्ये कृषीदुतांनी माती परीक्षणाचे महत्व व फायदे पटवून दिले.यामध्ये जमिनीमध्ये असणारे सेंद्रिय कर्ब् ,नत्र ,स्फूरद,पालाश व मातीचा सामु व त्या नुसार खतांच्या मात्रा मध्ये आवश्यक बदल यासाठी पायाभुत असणाऱ्या माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक कृषी दुतांनी करून दाखवले.व शेतकऱ्याच्या शंकाचे निरसन केले.
यावेळी कृषिदूत प्रतिक भुयेकर,ओंकार चव्हाण-खोत दिगंबर इंगळे, स्वप्निल जाधव,इंद्रनील ऐडके,हर्षद खिल्लारे उपस्थित होते.या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.एस.जे पाटील व उपप्राचार्य व कार्यक्रमाचे प्रमुख प्रा.एस.एच.फलके,कार्यक्रम समन्वयक डॉ. आर.टी कोळी व कार्यक्रम अधिकारी प्रा.ए.एस माळी व डॉ.एस.आर.कोळी यांचे मार्गदर्शन लाभले.

Spread the love
error: Content is protected !!