“मोठी बातमी” संतोष कदम खुनात माजी नगरसेवकांच्या चौकशीने सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ

कुरुंदवाड / प्रतिनिधी
सांगली येथील संतोष कदम खून प्रकरणी सांगलीचे माजी नगरसेवक मंगेश चव्हाण,बाळू गोंधळीसह 3 जणांची इचलकरंजी पोलीस उपअधीक्षक कार्यालय आणि कुरुंदवाड पोलिसातर्फे 2 तास चौकशी करण्यात आली.चौकशीसाठी त्यांना नोटीस देण्यात आली होती. त्यांचा जबाब नोंदवुन घेऊन ज्यावेळी पुन्हा चौकशीसाठी बोलविण्यात येईल त्यावेळी हजर राहण्याची समज नोटीस त्यांना देण्यात आली आहे.या खुनाची व्याप्ती वाढतच चालली असून माजी नगरसेवकांच्या चौकशीने सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान या खूनप्रकरणी संशयित आरोपींच्या पोलीस तपासणीतून आणखीन 2 संशयितांची नावे पुढे आली आहेत.पोलीस त्यांच्या मागावर आहेत.त्या आरोपींच्या मुसक्या आवळल्यानंतरच यातील मुख्य आरोपी कोण?यामध्ये आणखीन आरोपी कोण?हे स्पष्ट होणार आहे. संतोष कदम खूनप्रकरणी पुतण्या प्रफुल्ल कदम याने दिलेल्या फिर्यादित संतोष कदम हे माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ता म्हणुन काम करत होता.संतोष कदम यांचेवर हल्ला झाला होता.28 ऑक्टोबर 2022 साली सांगली पोलिसात गुन्हा दाखल केला होता.संतोष कदम याला माजी नगरसेवक चव्हाण व इतर लोकांच्यावर दिलेली तक्रार मागे घे म्हणुन वेगवेगळ्या लोकांचे धमकीचे फोन येत असलेबाबत सांगण्यात आले.त्यानुसार पोलिसांनी माजी नगरसेवक चव्हाण, गोंधळेसह 5 जणांनी मंगळवारी सकाळी 10 वाजता कुरुंदवाड पोलिसात जबाबासाठी हजर झाले होते. दुपारनंतर इचलकरंजी येथील पोलीस उपधीक्षक कार्यालयात उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांच्यातर्फे ही त्यांची चौकशी करण्यात आली.त्यांच्या चौकशीनंतर या खुनाचे कारण स्पष्ट होईपर्यंत तपासकामी पुन्हा चौकशीसाठी बोलविण्यात येईल त्यावेळी हजर राहण्याची ही नोटीस त्यांना देण्यात आली आहे.
Spread the love
error: Content is protected !!