कुरुंदवाड येथील कान्हेरी गणेश मंदिरामध्ये आज “माघी गणेश जयंती” हजारो भाविक,भक्तांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात झाली.यानिमित्त सकाळी श्री गणेशांची षोडोपचारे पुजा,सहस्त्रआवर्तने करण्यात आली.सकाळी दहा वाजता मंदिराचे पुजारी श्री.दत्तात्रय प्रभाकर जोशी(कुरुंदवाड) यांचा माघी गणपती जन्मकाळ यावर अत्यंत सोप्या भाषेत किर्तनाचा कार्यक्रम झाला.श्री गणेशाने महोत्कट अवतारामध्ये नरातंक व देवातंक या असुराचा वध केला म्हणुन त्याला धुम्रवर्ण असे नाव आहे.असे विषद केले.यावेळी श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या मनोबोधमधील गणाधीश जो ईश सर्व गुणांचा,मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा हा मुख्य अभंग निरुपणासाठी घेतला.दुपारी साडेबारा वाजता हजारो गणेशभक्तांच्या उपस्थितीत श्री गणेशजन्मकाळ सोहळा झाला.यानतंर प्रसाद म्हणुन सुंटवडा वाटप करण्यात आला.सांयकाळी सहा वाजता श्री सत्यविनायकाची पुजा करण्यात आली.आठ वाजता भाविकांच्या उपस्थितीत श्री गणेश आरती करण्यात आली.माघी गणेश जयंतीनिमित्त मंदिराला विविध रंगीबेरंगी फुलानी,आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते.रात्री उशिरापर्यंत गणेशभक्तांची श्री गणेश दर्शनासाठी रांग लागली होती.
उद्या बुधवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.याचा सर्व भाविकानी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.