ऊसतोडीसाठी पैसे दिला तर होणार मोठा दंड,
‘या’गावातील शेतकऱ्यांच्या बैठकीत निर्णय
टाकवडे / वार्ताहर
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता ऊस तोडीसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत ऊस मुकादम,वाहन चालक यांना पैसे न देण्याचा निर्णय शिरोळ तालुक्यातील टाकवडे गावातील शेतकऱ्यांनी घेतलाय
ऊसतोडीसाठी ऊसतोड टोळीला पैसे दिल्यास घेणारा व देणारा अशा दोघांनाही प्रत्येकी पाच हजाराचा दंड करण्याचा निर्णय साई सोना कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते मनोज चौगुले यांच्या नेतृत्वाखाली अमोल चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
सध्या ऊसतोडी सुरू झाल्याने ऊसतोड मजूर, वाहनधारक यांच्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याच्या तक्रारी होतात.त्यामुळे येथील ग्रामपंचायतीने ऊसउत्पादक शेतकरी,कारखान्यांचे फिल्डमन,तोडणी मुकादम,
वाहतूकदार यांची ग्रामपंचायतीसमोर बैठकीचे आयोजन केले होते.
ऊस आंदोलन यशस्वी केल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अभिनंदनाचा ठराव माजी सरपंच सिझाउद्दीन मुल्ला यांनी केला.चर्चेनंतर वाहनधारकांना एंट्री म्हणून द्यावयाची रक्कम निश्चित केली.
शिवाय फिल्डमनने क्रमपाळी चुकवून ऊसतोड दिल्यास कारवाईचा निर्णय घेतला.तसेच वाहनचालकाला ट्रॅक्टर सांगड अडीचशे रुपये,सिंगल ट्रॅक्टर,अंगद व बैलगाडी प्रत्येकी शंभर रुपये खुशाली देण्याचे निश्चित केले.
यावेळी उपसरपंच बाळासाहेब कदम,राजगोंडा पाटील, आप्पासाहेब पाटील,संतोषकुमार पाटील,मारुती चौगुले,श्रीपाद पाटील,रामचंद्र निर्मळ,सुनील निर्मळ,संजय पाटील,पोलिस पाटील सारिका कांबळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.