५० कांडी ऊस आणि २ लाख ६१ हजार ४५० रुपये विक्रमी उत्पन्न

शेती परवडत नाही… तरुणांनी शेती न करता नोकरी करा…असा आग्रह शेतकऱ्यांचा मुलांना असतो.मात्र योग्य नियोजन व कष्ट करण्याची जिद्द असेल तर याच शेतीतून भरघोस उत्पन्न मिळते हे दाखवून दिले आहे. शिरोळ येथील प्रगतशील युवा शेतकरी पंडित पाटील मलीकवाडे यांनी ३० गुंठ्यात तब्बल ८३ टन इतके विक्रमी ऊस उत्पादन घेतले.पंडित पाटील यांची हाळभाग शिरोळ येथे जमीन आहे.पाटील यांनी २२ जुलै २०२२ मध्ये ०२६५ फाउंडेशन या उसाची लागवड केली.या ऊसाला लागण बाळ भरणी वेळी तसेच भरणी व सेंद्रिय व रासायनिक खतांची वेळोवेळी लागवड दिली.सद्या ५० कांडी ऊस तयार असून याची ऊस तोड करून शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखाना पाठवण्यात आला.या उसाचे विक्रमी ८३ टन वजन मिळाले यातून त्यांना एकूण २ लाख ६१ हजार ४५० रुपये उत्पन्न मिळाले आहे.तर नांगरणी,मशागत,रासायनिक व शेणखते,बी बियाणे,फवारणी,भरणी असा एकूण ८० हजार रुपये खर्च आला आहे.या ऊस उत्पादनातून पाटील यांना १ लाख ८१ हजार ४५० रुपये निव्वळ नफा राहिला आहे.शेतीमध्ये आधुनिक वेगवेगळे प्रयोग,हवामान पाणी व योग्य नियोजनामुळे ५० कांडी ऊस तयार करून विक्रमी उत्पादन घेऊन शेती परवडत नाही अशा युवा शेतकऱ्यासमोर पंडित पाटील यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. विक्रमी उत्पादन घेतल्याबद्दल परिसरातील शेतकऱ्यासह कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाटील यांचे अभिनंदन केलं आहे.
Spread the love
error: Content is protected !!