जुने दानवाड / प्रतिनिधी
जनावरांची दुध उत्पादकता टिकवण्यासाठी आणि त्यांचे आरोग्यपूर्ण संगोपन होण्यासाठी त्यांना समतोल व परिपूर्ण आहार देणे आवश्यक आहे.पशुखाद्याच्या वाढत्या किमतीमुळे पशुखाद्याला पर्याय म्हणून अझोलाचा वापर फायदेशीर ठरतो.याचे कमी जागेत, कमी कालावधीत आणि कमी खर्चात उत्पादन घेता येते. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असणाऱ्या शरद कृषि महाविद्यालय, जैनापुर येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनीनी जुने दानवाडमध्ये अझोलाचे उत्पादनाचे प्रात्यक्षिक देऊन मार्गदर्शन केले.जुने दानवाड येथील शेतकरी प्रवीण गुरव यांच्या गोठ्याजवळ अझोला उत्पादनाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. अझोला तयार करण्यासाठी वाफे तयार करणे, प्लास्टिक पेपरचे आच्छादन, कल्चर सोडणे याबाबत माहिती आणि प्रात्यक्षिक पशुपालकांना दाखविण्यात आले. यावेळी परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. यावेळी कृषिकन्या तेजस्विनी खोले, रसिका पाटील, ऋतिका पाटील, योगिता पुजारी, तेजस्विनी रजपूत, सोनाली रोकडे उपस्थित होते. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.एस.जे पाटील, उपप्राचार्य आणि कार्यक्रमाचे प्रमुख प्रा. एस. एच. फलके, कार्यक्रम समन्वयक डॉ. आर.टी कोळी व कार्यक्रम अधिकारी प्रा. पी. व्ही.आवळे, व विशेषतज्ञ प्रा.एस.एम.निळे यांचे मार्गदर्शन लाभले .