जो नाही झाला ‘काकांचा तो काय होणार लोकांचा’ – विक्रमसिंह जगदाळे

निवडणूक आयोग, केंद्र सरकारची कटपुतली : शिरोळमध्ये शरद पवार गटाने केला निषेध
शिरोळ / प्रतिनिधी
महाराष्ट्राचा विकास नाही तर सिंचन घोटाळा लपविण्यासाठी अजित दादा भाजपात गेले.लहान मुलालाही माहित आहे राष्ट्रवादी कोणाची.अरे जो नाही झाला काकांचा तो काय होणार लोकांचा..अशा शेलक्या शब्दात अजित पवार यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह अजित पवार यांना गेल्याने शिरोळ येथे शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली.यावेळी शिरोळचे माजी सरपंच बी.जी.माने म्हणाले,आम्ही 1978 पासून शरद पवार यांच्या सोबत आहे.पण आज घरातील लोक त्यांच्या पासून बाजुला गेले.आणि राष्ट्रवादीत फुट पाडली आहे.स्वता:च्या स्वार्थासाठी त्यांनी फार मोठ नुकसान केल आहे.पण आजही आम्ही पवार साहेबांच्या सोबत असल्याचे सांगितले.तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे म्हणाले,शरद पवार ज्या ठिकाणी राहतील तो आमचा पक्ष.ते सांगतील ते आमचे धोरण,ते बांधतील ते आमचे तोरण,गाडीच्या कंपनीचा लोगो बदलला म्हणून ब्रँड बदलत नाही.शरद पवार हाच आमचा ब्रँड आहे. येणाऱ्या काळात शरद पवारांच्या विचारांचा आमदार शिरोळ तालुक्यातुन निवडून आणल्याशिवाय आम्ही स्वाथ बसणार नाही असा निर्धार केला.यानंतर दिगंबर सकट,डि.पी.कदमसर,राजगोंडा पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी श्रेणीक कोगनोळे, शाहीर आवळे,मौला पटेल,विशाल जाधव, तात्यासो शिरहट्टी,आप्पासो बुधाळे,श्रीकांत कोळी, आनंदा कोळी,किरण कोळी,संजय सोलापुरे,समीर दानवाडे,गौस म्हैशाळे,दिनेश कांबळे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Spread the love
error: Content is protected !!