ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना अपघात,महिला जागीच ठार

शिरढोणमधील अपघातात महिला जागीच ठार

शिरढोण येथील दर्गा चौकामध्ये उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना झालेल्या अपघातात इचलकरंजी येथील महिला जागीच ठार

झाल्याची घटना आज बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की,सदरची महिलाही मोटरसायकलवरून टाकवडेच्या दिशेने जात असताना येथील दर्गा चौकात ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना ट्रॅक्टरच्या मागील चाकात त्यांचा तोल गेल्याने त्या जागीच ठार झाल्याचे घटनास्थळावरून समजते. या घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून सदर घटनेचा पंचनामा सुरू आहे. दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

Spread the love
error: Content is protected !!