आएसटीईकडून दर्जा व उत्कृष्ट गुणवत्तेवर निवड : प्राचार्यांसह दोन प्राध्यापकांचाही सन्मान
शिरोळ / प्रतिनिधी
यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी,पॉलिटेक्ऩिकला नवी दिल्ली येथील इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (ISTE) कडून ‘बेस्ट इन्स्टिटयुट’ तर शरद इंजिनिअरिंगच्या ग्रंथालयाला ‘बेस्ट नॉलेज सेंटर’ अॅवार्ड नुकताच प्रदान करण्यात आला.
त्याचबरोबर प्राचार्य डॉ.संजय खोत यांना ‘बेस्ट प्रिन्सिपॉल’, प्रा.प्रविण थोरात यांना ‘बेस्ट टिचर’, प्रा.ए.एस.एन.हुसेनी यांना ‘बेस्ट इनोव्हेटीव्ह रिसर्च वर्क’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शाहु कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये झालेल्या महाराष्ट्र-गोवा विभागीय पुरस्कार प्रदान कार्यक्रमात राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. व्हि.एम. मोहितकर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्ऩॉलॉजीकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ. के.व्ही. काळे
यांच्या हस्ते शरद पॉलिटेक्निकचे प्राचार्य बी.एस.ताशीलदार, प्राचार्य डॉ.एस.ए.खोत,ग्रंथपाल प्रा.युवराज पाटील,प्रा. प्रविण थोरात,प्रा.ए.एस.एन.हुसेनी यांनी स्विकारला.
यावेळी आय.एस.टी.ईचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह देसाई, आय.एस.टी.ईचे चेअरमन रणजित सावंत,सेक्रेटरी डॉ. के.पी.कुंभार,डॉ.एस.जी.देशपांडे,प्राचार्य डॉ.यु.बी.शिंदे, डॉ. एस.जे.होनाडे,डॉ.डि.एल.भुयार उपस्थीत होते.
यावेळी डॉ.मोहितकर म्हणाले सध्या शिक्षण व्यवस्था संक्रमण काळातून जात आहे.त्यामुळे या शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येक घटकाची जबाबदारी व कर्तव्ये बदलत आहेत.हे बदल सर्वांनी आत्मसात करायला हवेत.
डॉ.काळे म्हणाले,अनेक क्षेत्रात आव्हान आहेत.ते आव्हाने न्यु एज्युकेशन पॉलिसीमधून सोडवता येईल.शिक्षण,शेती,आरोग्य, वहातुक व भाषा या क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी आहे.
या सर्व क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन मोठा विकास साधता येईल.
श्री.देसाई म्हणाले,देशातील हजारो संस्था,लाखो शिक्षक व विद्यार्थी आय.एस.टी.ई.शी जोडलेले आहेत.तांत्रिक शिक्षणामध्ये गुणवत्ता निर्माण करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे.या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर,एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.