नवसाला पावणारी शिरोळ नगरीची जागृत ग्रामदैवता श्री मरगुबाई देवी

नवसाला पावणारी शिरोळ नगरीची जागृत ग्रामदैवता
मरगुबाई देवी

शिरोळ / शशिकांत उर्फ सचिन पवार

मरगुबाई किंवा मरीआई देवी म्हणजे एक उग्र प्रकृतीची देवी म्हणजेच साथीच्या रोगांची शमन करणारी रोगराई पासून गावाची संरक्षण करणारी देवता म्हणून आपल्या महाराष्ट्रात किंबहुना संपूर्ण भारतात या देवीचे अस्तित्व आपल्याला पाहायला मिळते

याच मरगुबाई देवीला अनेक नामांतरे असलेली आपल्याला पाहायला मिळतील यामध्ये मरगुबाई, मरीआई,काली माता आणि जरी आई अशा नावाने भक्तगण संबोधित असतात.

यामध्ये जरी म्हणजे तापाची साथ आणि मरी म्हणजे पटकी देवी यासारख्या रोगांची साथ प्राणघातक साथींच्या रोगांची एक देवी कल्पून आपल्या महाराष्ट्रात या जरी आई म्हणजेच मरीआई ची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते.

शिरोळात ग्रामदैवत आणि जागृत असणाऱ्या देवीचे माहेरघर श्री मरगुबाई देवालय हे जुन्या शिरोळ नगरीच्या गावाबाहेर एका वडाच्या झाडाखाली सद्यस्थितीला मंदिर उभारलेले आपल्याला पाहायला मिळेल या ‘मरगुबाई’ देवीची मूर्ती दगडी पाषाणा मध्ये असून या देवीला शेंदूर लावलेला आहे.

कारण शेंदूर हे रक्ताचे प्रतिक मानून त्यामुळे या देवीची रुधिर प्रियता आणि तामस वृत्ती दिसून येते. नुकताच या मंदिराचा शिरोळ मधील जय महाराष्ट्र मंडळाने जीर्णोद्धार केलेला असून या मंदिराची पूजा-अर्चना येथील धनगर समाजाकडे पूर्वीपासूनच आहे.

मरगुबाई गावची ग्रामदेवता असलेमुळे येथील गावकऱ्यांचे या देवीवर अतिशय मोठ्या प्रमाणात श्रद्धा भक्ती भाव आपल्याला दिसून येतो.कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्याआधी या देवीला श्रीफळ नैवेद्य ओटी वगैरे अर्पण करूनच करतात

तसेच या देवीचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मरगुबाई म्हणजेच मरीआई देवी गावावर येणारे कोणत्याही साथीच्या रोगाचे संकट दूर करते ही दृढ श्रद्धा येथे आपल्याला पाहायला मिळेल.आणि याचा अनुभव म्हणजे शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी आलेल्या अनेक

महामारी रोगा मधील पटकी,प्लेग अशा रोगांच्या प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान किंवा तिची तीव्रता आपल्याला कमी प्रमाणात भोगावे लागले आणि आपली जीवन मान चांगले राहिले.आणि या महामारी रोगातून आपल्या गावाचे संरक्षण झाल्याचे अनेक जुनी लोक सांगतात.

या”मरगुबाई ” देवीची यात्रा आषाढी एकादशी नंतर थोड्याच दिवसांनी म्हणजे आषाढ कृष्ण ५ पूर्वा भाद्रपदा या शुभ नक्षत्रावर जर वर्षी या देवीची यात्रा केली जाते.शक्यतो हे नक्षत्र मंगळवार अथवा शुक्रवार या दिवशी हमखास येतं,

या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेच्या आदल्या दिवशी रात्री एक वाजता या देवीचे ज्यांच्याकडे पूजा अर्चना आहे.असा जो आमच्या शिरोळ मधील धनगर समाज बांधव आणि पारंपारिक या गावचे असणारे गावकामगार पोलीस पाटील आणि इतर मानकरी मिळून

शिरोळ गावच्या उशाला असणाऱ्या पवित्र पंचगंगा नदीतून ओल्या पडदीणे अतिशय सोहळ्याने धनगरी ढोल आणि घुमणारे कैताळ मधुर बासरी वादन अशा निनादात पंचगंगेचे पवित्र पाणी तांब्याच्या घागरी मधून आणली जाते.देवीला खारका,खसखस, दूध,बदाम,केळी अशा विविध प्रकारच्या पदार्थांच्या वस्तूंनी ‘महाअभिषेक’ घातला जातो.

तसेच या मरगुबाई देवीला कडू लिंबाच्या पाल्याचा विशेष मान आहे.तो अर्पण करून नंतर धूप आरती केली जाते आणि देवीला भंडाऱ्याची उधळण करून आणि श्री मरगुबाई देवीच्या पदस्पर्श झालेला हाच भंडारा आणि धूप आरती घेऊन धनगरी ढोल यांच्या साथीने गावकामगार पोलीस पाटील पूर्ण गावाच्या आठही दिशेने गावांमध्ये येणाऱ्या रस्त्यावर

म्हणजेच गावच्या प्रत्येक प्रवेशद्वाराच्या वेशीवर या देवीच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेला भंडारा,खारीक,खोबरे,लिंबू वगैरे येथे प्रोक्षण किंवा उधळण केले जाते.आणि याच प्रक्रियेला “चरक “असे म्हणतात.आणि या विधिवत प्रक्रियेमुळे गावामध्ये साथीचे आजार प्रवेश करीत नाहीत असा दृढ विश्वास आहे.

आणि याच दिवशी रात्री गावात येणाऱ्या किंवा आलेल्या महाभयंकर रोगाच्या साथीच्या आजाराच्या नावाने ‘मरीआईचा गाडा’ गावच्या प्रत्येक सीमेवर सोडण्याचा विधिवत कार्यक्रम केला जातो.यामुळे गावातून रोगांची साथ सीमेपार जाते.

अशी दृढ लोकश्रद्धा आहे.तशी ही देवता म्हणजे रोगाच्या साथी पासून वाचवणाऱ्या संरक्षक देवता म्हणून तिची ख्याती आहे.या देवीच्या माध्यमातून हिची मनोभावे पूजा करून या देवीला भक्त नवस करतात.

शिरोळ नगरीच्या जागृत असणाऱ्या ग्रामदेवता श्री मरगुबाई देवीला रोगाचे संकट, भरपूर पाऊस पडू दे,मानव जातीचे आयुष्य आरोग्य चांगले लाभो,या भूतलावरील सर्व मानव जातीचे कल्याण व्हावे.यासाठी मरगुबाई देवीला साकडे घालण्यात येतं.

आई मरगुबाई…
बया दार उघड…
बया दार उघड…
आई अंबाबाई…..
बया दार उघड…
बया दार उघड….
आई लक्ष्मीबाई…..
बया दार उघड…
बया दार उघड…..
आई म्हणुनी हाक मारतो….
आनंदाश्रूंनी पाय पुजितो…
धाव घे…आता माता…
बया दार उघड आता…..
भरजरी नेसली पट…
भाळी कुंकवाचा मळवट..
मस्तकी रत्नाचा सू किरीट..
पायी पैंजण रवा हो….
बया दार उघड आता…
दार उघड आता…
करी शस्त्रास्त्रे चमकती..
ईची करितो देवसुस्थी….
इची कळली प्रचंड शक्ती…
त्या चंड मुंड दानवा हो….
आई मरगुबाई…
बया दार उघड आता…
दार उघड….

Spread the love
error: Content is protected !!