राज्यात पेपरफुटीसंदर्भात राजस्थान,उत्तराखंडच्या धर्तीवर कडक कायदा करा : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरोळ मध्ये तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन
शिरोळ / प्रतिनिधी
महिला सुरक्षेसाठी कडक कायदे करा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना प्रचलित कायद्यातील त्रुटी दूर करून तात्काळ मदत देण्यात यावी.दुष्काळ संबंधित दोन्ही शासन निर्णयातील तफावत दूर करून सर्वच महसूल मंडळांना NDRF निकषांच्या चारपट मदत देण्यात यावी.राज्यात रिक्त असलेली सर्व विभागांच्या सर्व संवर्गाची अडीच लाख रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत.छुप्या पद्धतीने सुरु असलेली कंत्राटी भरती तात्काळ बंद करावी यासंह अन्य मागण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने शिरोळ येथील तहसिल कार्यालयासमोर मोदी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करीत आंदोलन केले.आणि मागणीने निवेदन नायब तहसिलदार योगेश जमदाडे यांना देण्यात आले.यावेळी शिरोळ तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे म्हणाले,महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही दिवसेंदिवस बिकट बनत आहे.अनेक दिवस कडाक्याच्या थंडीत आंदोलन करुनही अंगणवाडी सेविका,मदतनीस यांच्याकडे सरकार ढुंकूनही बघत नाही. असे अनेक प्रश्न आणि अडचणी लोकांना भेडसावत असूनही त्या सोडवण्याऐवजी सरकार जातीय वाद, धार्मिक संघर्ष आणि असेच इतर अनावश्यक मुद्दे पुढं आणून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्वच्छ व पारदर्शी नेते रोहितदादा पवार यांच्या मागे ईडी लावून सरकार काय साध्य करणार आहे ? हे तातडीने थांबवुन सामान्य नागरीकांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.शिरोळ विधानसभा अध्यक्ष अभिजीत पवार, स्नेहा वसंतराव देसाई, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संदीप बिरणगे, दिगंबर सकट यांनी केंद्र व राज्य शासनाच्या धोरणावर सडकून टीका केली. वसंतराव देसाई,कुरुंदवाड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी आलासे आदीनी संतप्त भावना सरकारच्या विरोधात व्यक्त केल्या.यावेळी शिरोळचे माजी सरपंच बी.जी.माने,तालुका उपाध्यक्ष राजगोंडा पाटील विशाल जाधव, मुल्ला पटेल,शहाजान जमादार,तात्यासाहेब शिरहटी, डि.पी.कदम,शाहिर आवळे,दिनेश कांबळे,अशोक कमते, सुरज भोसले,श्रेनिक कोगनोळे,भुजगोंडा पाटील आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या आंदोलनाचे नेतृत्व शिरोळ तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे, विधानसभा अध्यक्ष अभिजीत पवार,स्नेहा देसाई यांनी केले.