दानोळी / प्रतिनिधी
दानोळी येथे कर्मवीर मल्टीस्टेट सोसायटीच्या नवीन स्ववास्तुचे वास्तुशांत व गृप्रवेश झाला.संस्थेचे संचालक रावसो पाटील यांनी सपत्नी पूजाविधी केला.यावेळी संस्थेचे चेअरमन सागर चौगुले, दक्षिण भारत जैन सभेचे खजिनदार व संस्थेचे संचालक अरविंद मजलेकर,डि.ए.पाटील सर,कुमार पाटील प्रमुख उपस्थीत होते.
यावेळी श्री.चौगुले म्हणाले,दानोळी शाखा आता लवकरच स्ववास्तुत येईल.येथील नागरीकांच्या मनात संस्थेबद्दल विश्वास असून नवीन इमारतीत आणखी व्यवसाय होईल.संस्थेच्या संबधीत प्रत्येक व्यक्ती हा संस्थेचा घटक असून त्यांच्या या प्रेम,विश्वास यामुळेच हि संस्था इतक्या प्रगतीपथावर आहे. यापुढे ग्राहकांना आणखी सुविधा देण्यासाठी संस्था कटीबध्द आहे.
दरम्यान सकाळी भगवंताचे आगमण,अभिषेक,होम विधी व गृहप्रवेश झाला.यावेळी शरद इन्स्टिट्युटच्या ग्रंथालयाला‘बेस्ट नॉलेज सेंटर’ म्हणून पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल ग्रंथपाल युवराज पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संचालक आदिनाथ किणींगे, अनिल भोकरे, राजेंद्र नांदणे, आप्पा भगाटे, अनिल गडकरी, मनोहर उपाध्ये, सुभाष मगदूम, सीईओ रवींद्र पाटील, प्रकाश उपाध्ये, चंद्रकांत धुळासावंत, माजी जनरल मॅनेंजर श्रीधर चंदोबा,
दिपक पाटील,सुकुमार नेजकर,बापूसो चंदोबा यांच्यासह पदाधिकारी,अधिकार,स्टाफ,नागरीक उपस्थीत होते.
स्वागत डॉ.वकील पाराज यांनी केले.आभार शाखाधिकारी श्रीधर माणगांवे यांनी मानले.