घरातून बाहेर पडला आणि काही मिनिटातच युवकाचे झालं अपघातात दुर्दैवी निधन

हातकणंगले / प्रतिनिधी

मोटर सायकलला पाठीमागून कारने जोराची धडक दिल्याने मोटरसायकल स्वार रस्त्यावर पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला.हा अपघात कोल्हापूर सांगली राष्ट्रीय महामार्गावरील हालोंडी गावच्या हद्दीतील चंद्रप्रभा कापड दुकानासमोर आज दुपारीच्या सुमारास झाला.

भरत बाळासो परीट रा हालोंडी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.हातकणंगले तालुक्यातील हालोंडी इथला भरत बाळासो परीट वय ४० हा मौजे वडगाव फाट्यावरील सन इलेक्ट्रिकल्स या कंपनीत नोकरीस होता.तो दुपारीच्या सुमारास आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो नाईन डी व्ही 3474 वरून कामावर निघाला होता.

कोल्हापूर सांगली राष्ट्रीय महामार्गावरील हालोंडी गावच्या हद्दीतील चंद्ररूप कापड दुकानाजवळ आला असता कोल्हापूरहून सांगलीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव एक्स यु व्ही कारने पाठीमागून जोराची धडक दिल्याने जवळपास 100 फूट फरपटत जाऊन मोटर सायकल स्वार उडून डांबरी रस्त्यावर आपटला त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला.

तर कारच्या दोन्ही बाजूची एअर बॅग उघडल्याने कार मधील चालकासह प्रवासी सुदैवाने बचावले.भरत परीट हा काही मिनिटापूर्वीच घरातून बाहेर पडला होता आणि त्याचे अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धावली.अपघातस्थळी वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाले आहे.

Spread the love
error: Content is protected !!