ग्रामसेवक गाव सभेलाच गैरहजर,खिद्रापूर ग्रामस्थांचा संताप

खिद्रापूर येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभा बोलावली होती पण सरपंच काही अपरिहार्य कारणास्तव गैरहजर होते. तर ग्रामसेवक इतर गावच्या गावसभेत असल्याचा बहाना सांगून खिद्रापूरची गाव सभा टाळली असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.सर्व ग्रामस्थांनी सरपंचांच्या गैरहजेरीत उपसरपंच यांना या सभेचे अध्यक्ष घोषित केलेले सभेला सुरुवात झाली.सभा सुरू होण्यापूर्वीच ग्रामस्थ आणि सत्ताधारी यांच्यात शाब्दिक चकमक होऊन वाद वाढत गेला आणि खिद्रापूरची गाव सभा वादळी ठरली.ग्रामपंचायत लिपिक यांनी विषय पत्रिकेवरील पहिलाच विषय वाचता त्यामध्ये फार मोठी तफावत ग्रामस्थांना जाणवल्याने लिपिकावर ग्रामस्थांच्याकडून प्रश्नांचा भडीमार करण्यात आला पण या प्रश्नांना उत्तर देण्यास लिपिक जबाबदार नसून त्यासाठी ग्रामसेवक हजर असणे गरजेचे असल्याचे मत सदस्यांनी बोलून दाखवले.त्यामुळे ही सहभाग तहकूब करून ग्रामसेवक हजर असलेल्या दिवशीच घेण्यात यावी असे सर्वानुमते ठरले.ग्रामसेवकाने मनमानी कारभार करून ग्रामपंचायत इकडून देखभाल दुरुस्ती होत नाही. या कारणास्तव खिद्रापूर येथील शाळेच्या दोन खोल्या सिओंच्या नावे करण्याचा ठराव केला आहे.याबाबतची माहिती ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या सदस्यांना देखील देण्यात आलेली नाही. तसेच खिद्रापूर येथे झालेल्या अनेक विकास कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याची शंका व्यक्त केली आहे.शाळेमध्ये देण्यात आलेले संगणक, शाळेसाठी बांधण्यात आलेले शौचालय, अंगणवाडीचे भरण्यात आलेले वीज बिल या अशा अनेक भानगडीत ग्रामसेवकाने मोठा ढपला पाडल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. त्या कारणास्तवच आज बोलवण्यात आलेल्या ग्रामसभेत जाणीवपूर्वक ग्रामसेवक गैरहजर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.खिद्रापूरचे ग्रामसेवक रवींद्र वैरागी यांची खातेनिहाय चौकशी व्हावी. अशी मागणी या गाव सभेत करण्यात आली आहे.

Spread the love
error: Content is protected !!