जयसिंगपूर / प्रतिनिधी
अयोध्या नगरीमध्ये आज 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिर प्रतिष्ठान उत्सव साजरा होणार आहे तो उत्सव संपूर्ण देशभरात साजरा होण्यासाठी गीता परिवाराचे संस्थापक अध्यक्ष गोविंद देवगिरी जी महाराज यांच्या आशीर्वादाने जयसिंगपूर नगरीत श्री राम लल्ला प्रतिष्ठापना गीता परिवार आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने 20 ते 22 जानेवारी मध्ये श्रीराम मंदिर प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
श्री हनुमान बगस जी मालू चॅरिटेबल ट्रस्ट जयसिंगपूर या राम मंदिरामध्ये उत्सव साजरा केला जात आहे राम मंदिराची स्थापना 1977 सण श्री हनुमान भगतजी मालू चारिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आली आहे लक्ष्मीनारायण मालू जयसिंगपूर,हिरालाल मालूपुणे, रामकृष्ण मालू कोल्हापूर, शिवप्रताप जी सारडा सांगली,घनश्याम बजाज सांगली,भालचंद्र कुंभोज कर, बाबूलाल मालु जयसिंगपूर यांनी यामध्ये पुढाकार घेतला आणि जयसिंगपूर मध्ये सुंदर असे राम उभारणी झाली आहे.1990 मध्ये वडिलांच्या निधनानंतर श्याम सुंदर हे समर्थपणे देखभाल करतात प्रत्येक रविवारी बालू उपासना तसेच राम नवमी उत्सव आदी विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात 37 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या राम मंदिरामध्ये गीता परिवाराच्या श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठापना उत्सव समितीच्या वतीने गोविंद देव गिरीजी महाराज यांचे परम शिष्य अमोलजी दायमा यांच्या मुधुरवाणीने श्री राम चरित्र मानस,भजन संध्या, शंकरराव कुलकर्णी पटवारी यांचे कीर्तन,हनुमान चालीसा आधी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर विविध स्पर्धाही घेण्यात आले आहेत. शनिवारी सोनाई साधना भजनी मंडळाच्या कार्यक्रम, सुंदर कांड आरती व प्रसाद, ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने व रात्रीअमोलजी दायमा यांचा भजन संस्थेचा कार्यक्रम संपन्न झाला.सामुदायिक रामरक्षा पठण प्रसाद हेगिष्टे यांचे गीत रामायण,सद्गुरु कृपा भजनी मंडळाचे भजन,सामुदायिक हनुमान चालीसा पठण, शाहीर अण्णाप्पा, बंडगर संभाजी पुजारीव सहकारी, बिरदेव ओवीकार मंडळ उदगाव यांचा धनगरी ओव्यांचा कार्यक्रम संपन्न झाला.श्री तुळजाभवानी जागरण मंडळ जयसिंगपूर यांच्या गोंधळ कार्यक्रमाने कार्यक्रम संपन्न झाला.सोमवारी सकाळीहोम हवन,किर्तन,सकाळी साडेअकरा ते एक वाजेपर्यंत अयोध्या येथील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी महाप्रसादाचे या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे.