कुरुंदवाड / प्रतिनिधी
शिवसैनिकांच्यासह महाराष्ट्राला स्वाभिमानाची शिकवण देणारे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती जिल्हाभर मोठ्या उत्साहाने साजरी करून पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा मंत्रालयावर फडकवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करूया असे आवाहन कोल्हापूर जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाध्यक्ष वैभव उगळे यांनी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे शिवसैनिकांच्या पदाधिकारी बैठकीत बोलताना केले बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हास पाटील हे होते.
कोण कुठे जातो कोण कुठे आहे याचा विचार न करता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वाभिमानी विचार सामान्यांच्या दारापर्यंत पोचवून प्रत्येक गाव व शहरातून त्यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करूया असे सांगून जिल्हाप्रमुख वैभव उगळे शिवसैनिकांना सज्ज राहण्याचे आदेश दिले.यावेळी या जयंती निमित्त प्रत्येक शाखेने आपल्या गावात फोटो पुजन,शाखांचे डिजीटल बोर्ड लावावे,आरोग्य शिबीर, स्पर्धा, सामाजिक उपक्रम रुग्णांना फळे वाटप अनाथ आश्रमात धान्यवाटप या विविध कार्यक्रमांनी जयंती साजरी करण्याच्या सूचना जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांनी दिल्या.
यावेळी सहसंपर्कप्रमुख हाजी अस्लम सय्यद, मा.आ.उल्हासदादा पाटील,जिल्हा संघटीका मंगल चव्हाण,तालुका संघटीका साजिदा घोरी,दयानंद मालवेकर,बाळसिंग रजपूत,ऋषभ चौगुले यांनी मनोगत व्यक्त व्यक्त करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर राहण्याचे आवाहन केले.या बैठकीचे स्वागत युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रतिक धनवडे, यांनी केले तर आभार युवासेना तालुकाप्रमुख निलेश तवंदकर यांनी मानले.यावेळी उपतालुकाप्रमुख युवराज घोरपडे,विकास सुतार,राजू पाटील,किरण देसाई, शहरप्रमुख तेजस कुराडे,सतीश चव्हाण,गणेश सुतार, कृष्णा भेंडे व शिवसेना-युवासेना,महिला आघाडी चे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थितीत होते.