दलितमित्र डॉ अशोकराव माने यांनी श्री राम मंदिरात केली स्वच्छता
शिरोळ / प्रतिनिधी
आयोध्या येथील श्री राम जन्मभूमीत होणाऱ्या श्री रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने शिरोळ येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.या धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद सदस्य व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा व जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते दलित मित्र डॉ अशोकराव माने यांनी शुक्रवारी सकाळी येथील श्री राम मंदिरात येऊन मंदिर आवारात स्वच्छता केली.श्री राम जन्मभूमी आयोध्या येथे नव्याने उभारण्यात आलेल्या तीन मजली श्री राम मंदिरातील तळमजल्यात श्री रामाची बाल अवस्थेतील श्री रामलल्ला या मूर्तीची प्रतिष्ठापना सोमवारी होणार आहे.या निमित्ताने या दिवशी देशभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे शिरोळ येथील श्रीराम मंदिरात यानिमित्ताने धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद होणार आहे.श्री राम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने सर्व मंदिरांची स्वच्छता करण्यात येत आहे.त्यामुळे भारतीय जनता पार्टी व जनसुराज्य शक्ती पक्षाचे हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे नेते दलित मित्र डॉ अशोकराव माने यांनी शुक्रवारी सकाळी श्री राम मंदिरात येऊन मंदिरात झाडलोट करत फरशी पुसून स्वच्छता केली.यावेळी श्री गुरुदत्त शुगर्सचे संचालक शिवाजीराव माने-देशमुख, शिवाजीराव जाधव-सागले,माजी नगरसेवक विजय उर्फ दादासो कोळी,श्रीराम मंदिर उत्सव समितीचे प्रमुख दिलीपराव माने,रामचंद्र पाटील,बाळासाहेब कोळी,बजरंग काळे,चंद्रकांत भाट,सागर कोळी,बबन बन्ने,ओंकार माने, बाळासो खोंद्रे,अभिजीत गावडे यांच्यासह श्रीराम भक्त उपस्थित होते