जयसिंगपूर / प्रतिनिधी
जयसिंगपूर येथील गल्ली नंबर १० हाँटेल सन सिटी समोर निल पान टपरीच्या शटरची दोन्ही बाजूला असणारे कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश करुन पाच हजारांची रोख रक्कम चोरून नेली आहे अशी फिर्याद रतन आल्लाबक्ष शिकलगार व.व.५० राहणार यादवनगर जयसिंगपूर यांनी पोलीसांत दिली.जयसिंगपूर पोलीसांत अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मंगळवार दिनांक १६ जानेवारी २०२४ रोजी रात्री ११ ते बुधवार दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ५ च्या सुमारास जयसिंगपूर गल्ली नंबर १० येथे हाँटेल सन सिटी समोर निल पान टपरीच्या शटरला दोन्ही बाजूला असणारे कुलुप अज्ञात चोरट्याने कशानेतरी तोडून आत मध्ये प्रवेश करून पान टपरी मध्ये असणारी रोख रक्कम पाच हजार चोरून नेली आहे.त्यामध्ये रोख रक्कम तीन हजार पाचशे व एक,दोन रुपयांची नानी असा एकुण पाच हजाराची रोख रक्कम चोरून नेली असलेची फिर्याद रतन शिकलगार यांनी जयसिंगपूर पोलीसांत दिलेने जयसिंगपूर पोलीसांत अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पो.ना. कुलकर्णी हे करीत आहेत.