छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्वागत मिरवणूक

कागलमध्ये निपाणी वेस येथे प्रतिष्ठापना करावयाच्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्वागत मिरवणूक मोठ्या जल्लोषात निघाली. शहरातील मुख्य बाजारपेठेतून निघालेल्या या मिरवणुकीआधी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ माझ्या व माजी आमदार संजयबाबा घाटगे, शाहू साखरचे संचालक बॉबी माने, सदासाखरचे संचालक महेश घाटगे यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन झाले. सकल मराठा समाजाच्या वतीने निपाणी वेशी मध्ये बांधकाम केलेल्या चबुतऱ्यावर या पुतळ्याची प्रतिष्ठापना होणार आहे. मी व श्री. घाटगे, श्री. माने व श्री. घाटगे यांच्यासह विविध मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले.मिरवणुकीच्या पुढे झांजपथक, मर्दानी खेळ, हलगी पथक, धनगरी ढोल पथक, दाक्षिणात्य ढोल पथक आदींचा समावेश होता. बस स्टॅन्ड, बॅरिस्टर खर्डेकर चौक, पोलीस स्टेशन, गैबी चौक मार्गे निपाणी वेस येथे या मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणुकीवर ठीकठिकाणी गॅलरी आणि स्वागत कमानींवरून फुलांचा वर्षाव होत होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणांच्या निनादात ही मिरवणूक निघाली.
कागलनगरी मानवता आणि समतेचे पुरस्कर्ते राजर्षी शाहू महाराजांची भूमी आहे. सकल मराठा समाजाच्यावतीने सर्वच राजकीय पक्षांसह सर्वच जाती-धर्मीयांना व विविध संघटनांना एकत्रित घेऊन प्रतिष्ठापना होत असलेला स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल.यावेळी नितीन दिंडे, नितीन काळबर, नाना बरकाळे, प्रकाश जाधव, सचिन मोकाशी,शशिकांत भालबर, दीपक मगर, सतीश पोवार, महेश मगर, राहुल चौगुले, राहुल माने,संजय ठाणेकर, संजय चितारी, अमन आवटे, शुभम घाडगे, दिग्विजय डुबल, प्रशांत म्हातुगडे, मेघराज वाघमारे, प्रताप उर्फ भैयासाहेब माने, प्रकाशराव गाडेकर, चंद्रकांत गवळी, नवल बोते, तात्या पाटील, अस्लम मुजावर, सौरभ पाटील, सुनील माने, नवाज मुश्रीफ, इरफान मुजावर, महेश घाटगे, ईगल प्रभावळकर, सर्जेराव चव्हाण, बॉबी माने, राजेंद्र जाधव, नंदकुमार माळकर, रणजीत पाटील, दिलीप घाटगे, आप्पासाहेब हूच्चे, रमेश माळी, राम रेवडे, बंडा वाळवेकर, सचिन मोकाशी, किसन मोरे आधी प्रमुखांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!