गावठी कट्टा बाळगणाऱ्या एकाला अटक
कुरुंदवाड / प्रतिनिधी
मजरेवाडी ता.शिरोळ दरम्यानच्या टाकळीवाडी रस्त्यावर 25 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सांगली जिल्ह्यातील विशाल नागेश कांबळे(वय.29 रा. अहिल्यानगर झोपडपटटी माधवनगर ता.मिरज)याला कुरुंदवाड पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंदी आदेश लागू असताना संशयित आरोपी कांबळे हा दीड वाजण्याच्या सुमारास टाकळीवाडी जाणाऱ्या रस्त्यावर बाळु मामा मंदीर समोर विनापरवाना बेकायदेशीर देशी बनावटीचे स्टिल बॉडी असलेला, बरेल 6 इंच लांबीचा,बटसह 8 इंच लांबीच्या
बॉडीचा,बटच्या दोन्ही बाजुला लाकडी पटटी स्क्रू मध्ये फिटींग असलेला, कटटयाच्या डाव्या बाजुस स्प्रिंगमध्ये बरेल उघडण्यासाठी बसवलेला नट,बॉडीला स्टीलचे ट्रिगर गार्ड असलेला गावठी कटटा (अग्नीशास्त्र) स्वतःचे कब्जात जवळ बाळगलेला मिळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.