कत्तलखान्यात जनावरे घेऊन जाणाऱ्या ट्रकवर शिरोली पोलिसांची कारवाई ५ लाख १८ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागांव फाटा येथे कर्नाटकात कत्तलखान्यात जनावरे घेवून जाणारा मिनी ट्रक प्राणी मित्रांनी पोलिसांच्या मदतीने पकडून सुमारे ५ लाख १८ हजारांचा मुददेमाल ताब्यात घेवून जणावरे गोशाळेत पाटवण्यात आली. पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार आज सोमवारी पेठवडगांव येथील आठवडा बाजारातून गोवंश जातीची गायीची वासरे व म्हैशीची पारडी ही जनावरे कत्तल करण्याच्या उददेशाने कर्नाकच्या दिशेने सुझुकी कंपनीची सुपर क्यारी मिनी ट्रक क्रमांक एम एच 09 जी जे 1671 या मालवाहतुक गाडीमधून घेवून जात असताना काही प्राणी मित्राना शिये फाटा येथे दिसल्यावर त्यानी गाडीचा पाठलाग करून नागांव फाटा आडवून गाडी चालकाकडे जनावरांबाबत चौकशी केली असता त्यानी गोवंश जातीची गायीची वासरे व म्हैशीची पारडी ही स्वप्नील मधुकर सुर्यवंशी यांची आहेत.व ती कर्नाटक राज्यात संकेश्वर येथे असलेल्या कत्तल खान्यात सोडण्यासाठी घेवुन जात आहे यामध्ये 7,000 किमतीचे गोवंश जातीची गायीची वासरे 14 प्रत्येकी किंमत अंदाजे 500/- रूपये प्रमाणे व 11,500/ म्हैशीची पारडे 23 प्रत्येकी किंमत अंदाजे 500/- रूपये प्रमाणे व गाडी असे एकुण 5 लाख 18 हजार 500 किंमत मुददेमाल पोलिसानी ताब्यात घेतला यावेळी प्राणी मित्र वैभव जाधव,आशिष बारिक तसेच शिरोली श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी अर्जुन चौगुले, सुजित करके,नितीन दळवी, प्रशांत पाटील निलेश लंबे,विनोद यादव, आदींचे सहकार्य लाभले