२२ जानेवारीला दिपोत्सव ज्ञानेश्वरीतील दिपांच्या ओव्यांचे वाचन करून साजरा करावा : ह.भ.प.सिद्धार्थ मुगळी महाराज

२२ जानेवारीला दिपोत्सव ज्ञानेश्वरीतील दिपांच्या ओव्यांचे वाचन करून साजरा

करावा : ह.भ.प.सिद्धार्थ मुगळी महाराज

अर्जुनवाड / प्रतिनिधी

दि.२२ जानेवारी२०२४ रोजी आयोध्या नगरी मध्ये प्रभु रामचंद्र यांच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार असून यानिमित्त देशभरातून प्रत्येक देवांच्या मंदिरात दिपोत्सव होणार आहे.तरी प्रत्येक गावातील मंदिरात सर्वांनी मिळून दिपोत्सव साजरा करण्या बरोबर भव्य दिव्य पालखी मिरवणूक काढावी. ज्ञानेश्वरी ग्रंथांतील दिपांच्या ओव्यांचे वाचन करावे. यावेळी सर्वप्रथम रामकृष्ण हरी भजनाने सुरुवात करून मंगलचरण म्हणावे . दिपोत्सव व ओव्यांचे वाचन करावे, पसायदान म्हणून आरती करून सांगता करावी.महाराष्ट्र ही संतांची भूमी असून विठ्ठल भक्तांची संख्या मोठी असून प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापणेच्या निमित्ताने संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वरांचे आचार – विचारांची देवाण -घेवाण होणे गरजेचे आहे. म्हणून या निमित्ताने दिपोत्सवात ज्ञानेश्वरी ग्रंथातील दिपांच्या ओव्यांचे वाचन सर्वांनी करावे असे ही ह.भ.प. सिद्धार्थ मुंगळी महाराज यांनी बोलताना सांगितले.

Spread the love
error: Content is protected !!