शालेय राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत गंगामाईच्या दोन विद्यार्थिनींना सुवर्णपदक प्राप्त

इचलकरंजी / प्रतिनिधी

भारतीय शालेय क्रीडा महासंघ,नवी दिल्ली अर्थात एस. जी.एफ.आय.क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद,नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 19 वर्षाखालील शालेय,शासकीय राष्ट्रीय खो-खो स्पर्धा नुकत्याच नाशिक येथे पार पडल्या.

 

या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या खो-खो संघामध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनी कु.स्वाती भिमगोंडा पाटील, इ.12 वी आर्ट्स ब व कु.वैष्णवी बजरंग पोवार,इ.11 वी आर्ट्स क या दोघींची निवड झालेली होती.या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र

 

संघाकडून खेळताना त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत राज्याला सुवर्णपदक मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.दोन्ही खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख प्रा.शेखर शहा,क्रीडाशिक्षक डॉ.राहुल कुलकर्णी व श्री तात्यासाहेब कुंभोजे यांचे मार्गदर्शन लाभले.

 

प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस.एस.गोंदकर, उपमुख्याध्यापिका सौ.एस.एस.भस्मे,उपप्राचार्य श्री आर. एस.पाटील,पर्यवेक्षक श्री व्ही.एन.कांबळे,पर्यवेक्षक श्री एस.व्ही.पाटील यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.
ना.बा.एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवासजी बोहरा,चेअरमन कृष्णाजी बोहरा,व्हाईस चेअरमन

 

उदयजी लोखंडे,खजिनदार राजगोपाल डाळ्या,मानद सचिव बाबासाहेब वडिंगे,स्कूल कमिटी चेअरमन मारुतराव निमणकर,विश्वस्त अहमद मुजावर,विश्वस्त  महेश बांदवलकर तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व विश्वस्त यांचे खेळाडूंना बहुमोल सहकार्य लाभले.

Spread the love
error: Content is protected !!