बिद्री ता.कागल येथे नव्याने सुरु केलेल्या श्री दत्तामामा फराकटे शेती सेवा केंद्र व महा ई सेवा केंद्राचे उदघाटन माझ्या हस्ते पार पडले.शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धतींचा वापर करणे ही काळाची गरज बनली आहे.त्यासाठी गावपातळीवर शेती सेवा केंद्रांची उभारणी होत असून अधिक उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी अशा कृषी सेवा केंद्रातून दिल्या जाणाऱ्या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.यावेळी बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के.पी.पाटील, उपाध्यक्ष गणपतराव फराकटे,केडीसीसीचे संचालक भैय्या माने,गोकुळचे संचालक आर.के.मोरे,भोगावती कारखान्याचे संचालक ए.डी.पाटील,भगवान डोणे महाराज,बिद्रीचे संचालक सुनीलराज सूर्यवंशी,रावसो खिल्लारी,रणजीत मुडूकशीवाले,माजी संचालक वसंतराव पाटील,शशिकांत खोत,आनंदराव फराकटे,माजी सरपंच सुभाष भोसले,नारायण पाटील,देवानंद पाटील, डॉ.इंद्रजीत पाटील,संजय पाटील,राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा शितल फराकटे,माजी सरपंच गोविंद फराकटे,बाळासाहेब फराकटे,शहाजी फराकटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.