अ.लाट केंद्रांतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा विषयी मुख्याध्यापक कार्यशाळा संपन्न

अब्दुललाट / प्रतिनिधी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा कार्यशाळा केंद्रीय शाळ अ.लाट येथे अ. लाट केंद्रातील मुख्याध्यापकांची मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा या विषयांवरील कार्यशाळा संपन्न झाली.सदर कार्यशाळेत अभियानाची माहिती व अंमलबजावणी करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केंद्रीय प्रमुख सलीम आत्तार यांनी मुख्यमंत्री

 

माझी शाळा,सुंदर शाळा या अभियानाची माहिती दिली.अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज अ.लाटचे प्राचार्य डॉ.देवेंद्र कांबळे यांनी ही मार्गदर्शन केले.सदर कार्यशाळेसाठी जिल्हा परिषदेचे व खाजगी शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!