पु.शिरोलीत कोंडधारी श्रीरामांची मूर्ती वस्ती मित्र यांना प्रदान

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

अयोध्ये मधून कोंडधारी श्रीरामांची मूर्ती वस्ती मित्र संदीप पोर्लेकर व विजय सूर्यवंशी यांना प्रदान या मूर्तीचे वारकरी संप्रदायाच्या टाळ मृदंगाच्या गजरात यात्रेतून शोभायात्रा काढण्यात आली.

अनुलोम लोकराजा महाभि या संस्थेच्या माध्यमातून श्रीराम मूर्ती प्रधान सोहळा कार्यक्रम पार पडला अनुलोमच्या वस्ती मित्रांना आयोध्या मधून कोंडधारी श्री रामाची मूर्ती वस्ती मित्र संदीप पोर्लेकर व विजय सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात आली.तसेच हातकणंगले

 

विधानसभा मध्ये 32 वस्ती मित्र आहेत त्या सर्व वस्ती मित्रांना श्रीरामांची मूर्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मिळत आहे असे अनुलोमचे भाग जनसेवक प्रभाकर घोळ अजित कोळी यांनी वस्ती मित्रांची भेट घेऊन सांगितले होते.शिरोलीचे वस्ती मित्र

 

संदीप पोर्लेकर यांनी भक्तिमय वातावरणात व जय श्रीराम,सियावर रामचंद्र की जय,जय हनुमान घोषणा देत शोभायात्रा काढून आपल्या घरामध्ये श्रीरामाचे मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.येत्या 22 जानेवारीला अभिषेक घालून प्रसाद देऊन राम भक्तांना दर्शन द्यायचे आहे असे सांगण्यात आले.

 

यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी योगेश खवरे,संपत संकपाळ,दिलीप शिरोळे,भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष राजेश पाटील,बजरंग दलचे प्रशांत कागले,निलेश शिंदे,आर एस एस चे कुमार पाटील,शिवप्रतिष्ठानचे अर्जुन चौगुले,अनिल चौगुले,

 

मधुकर पद्ममाई,वारकरी संप्रदाय व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शोभायात्रा छत्रपती संभाजी महाराज चौक ते शिरोली माळवाडी येथील जय हनुमान घोडेगिरी तालीम मंडळ पर्यंत काढण्यात आली.

Spread the love
error: Content is protected !!