दत्तवाड /प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनांतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा कार्यशाळा केंद्रीय शाळा कन्या दत्तवाड येथे दत्तवाड केंद्रातील मुख्याध्यापकांची मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा या विषयांवरील कार्यशाळा संपन्न झाली.सदर कार्यशाळेत अभियानाची व्याप्ती व अंमलबजावणी याबाबत केंद्रीय प्रमुख सुभाष कुरुंदवाडे यांनी मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा या अभियानाची माहिती दिली.अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत सखोल मार्गदर्शन केले.सदर कार्यशाळेसाठी जिल्हा परिषदेचे व खाजगी शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते.सदर कार्यशाळेसाठी रमेश कोळी,राजू जुगळे,दिलीप शिरढोणे,सहदेव माळी यांचे सहकार्य लाभले.