५ कोटी ३१ लाख शिरोळ ते कुटवाड ते शिरटी रस्त्याच्या कामांचे शुभारंभ
उपस्थित नागरीकांनीआमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे मानले आभार
शिरोळ / प्रतिनिधी
शिरटी ता शिरोळ येथील महावीर नगर वीज बोर्ड मार्गे हा रस्ता अत्यंत खराब झाला होता.२००५-१९-२१मध्ये आलेल्या महापुरामध्ये नागरिकांना बाहेर पडण्यासाठी या रस्त्यांवरून जावे लागले.तेव्हा पासून हा रस्ता महापुरातून बाहेर पडण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून ओळखला जातो या रस्त्यावरून घालवाडचे आरोग्य केंद्र घालवाड मार्गे मिरज ला जाण्यासाठी शिरटी व हसुर मधील नागरिकांना ये जा करण्यासाठी सोईस्कर रस्ता आहे.रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली होती.गेल्या पंधरा वर्षांपासून रस्त्यांच्या कामाविषयी मागणी होत होती जनतेच्या समस्यांना गांभीर्याने घेतले जात नव्हते. मात्र आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन पाठपुरावा करून,आता हा रस्ता चकाचक होणार असल्यामुळे महावीर नगर मधील नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.काही ठिकाणचे रस्ते पुर्णत्वास येत असल्याने जनतेमधून समाधान व्यक्त होत आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी वेगवेगळ्या निधी अंतर्गत रस्त्यांची सर्व कामे मार्गी लावलेली आहेत.यामुळे त्यांच्या कामांची चर्चा सर्वत्र होत आहे.या रस्त्याचे प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानें नागरीकातुन समाधान व्यक्त होत आहे.तसेच कुटवाड शिरोळ हा ही रस्ता मंजुर करण्यात आले आहे.या कामांचे शुभारंभ कुटवाड कनवाड,हसुर,घालवाड,शिरटी,महावीर नगर मधील नागरीकाच्या हस्ते नारळ फोडण्यात आले.
प्रगतशील शेतकरी रामचंद्र कोगनोळे यांनी आपल्या मनोगतात म्हणाले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मंत्री मंडळातले कॅबिनेट मंत्री म्हटले तरी काही हरकत नाही आज आपली ही फार दिवसापासून शिरटी महावीर नगर रस्ता व्हावी हि अपेक्षा होती.आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नाने पूर्ण झाली.शिरटी ते महावीर नगर हा रस्ता अत्यंत संकटकालीन मार्ग म्हणून ओळखला जातो गेल्या ३५ ते ४० वर्षापासून रस्त्यासाठी प्रयत्न सुरू होता, सर्वांनी आपापल्या पद्धतीने प्रयत्न केले त्यास फारशी यश आले नाही परत आमदार राजेंद्र पाटील यांनी विशेष लक्ष घालून शिरटी गावाला महापुराच्या संकटातून वाचविण्याचा फार मोठा प्रयत्न केले आहेत जेष्ठ पत्रकार सुरेश कांबळे यांनी मनोगतात व्यक्त केले.शिरोळ ते कुटवाड कनवाड हसुर या गावातील नागरिकांना बाहेर पडण्यासाठी हा एकमेक मार्ग आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षात या रस्त्याकडे कोणीही पाहिले नाही कुटवाड मध्ये ज्यावेळी महापुराची बैठक पार पडली त्या बैठकीत या रस्त्याचा निर्णय घेण्यात आला होता जेणेकरून बाहेर पडताना कोणतीही अडचण येऊ नये याची दक्षता घेतली आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची मी कुटवाड नागरिकाकडून आभार मानतो प्रशांत पाटील सामाजिक कार्यकर्ते कुटवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य विपुल कोगनोळे, अभय गुरव, सूर्यकांत ऊदगांवे,सुरेश टारे,धनाजी भोसले, अण्णा सुतार, जीवधर चौगुले,कल्लाप्पा खवाटे,रामगोंडा पाटील, अनिल ढेकळे,अजित थोरवत, मुसा इनामदार, संजय कोळी,बी.ए.पाटील,दादेपाशा पटेल,दादासो गतारे,महावीर चौगुले,जेष्ठ पत्रकार आनंदा शिंगे,पोपट चौगुले,सुहास खाडे,भरत शिखरे,प्रतिक कोगनोळे, श्रेणिक मगदुम,अशोक चौगुले, संपत रामोजी,वसंत मगदूम, संजय मगदुम, महावीर दानोळे,चंद्रशेखर
कुभोजकर, श्री भैरेश्वर ग्रामविकास आघाडी,भैरेश्वर फ्रेंड्स सर्कल मंडळाचा राजा अमोल ग्रुपचे सर्व पदाधिकारी शिरटी कुटवाड कनवाड हसुर घालवाड येथील प्रतिष्ठित नागरिक सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार सामाजिक कार्यकर्ते अलम मुल्लाणी यांनी मानले.