कवठेगुंलद आलास दरम्यान आलास हद्दीतील गट नंबर 743 विनोद जगताप यांच्या हद्दीतील गाळपासाठी . जवाहर कारखाना हुपरीस गाळपासाठी जाणारा ऊस बाळासाहेब आवळेकर (औरवाड) यांचे हार्वेस्टर मशीन ऊस तोड चालू असताना अचानक इंजिन गरम होऊन वायरिंग शार्ट झाल्याने पेट घेतला.लागलेली आग विझवण्यासाठी ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकांमधील पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला.परंतु तुटलेल्या उसाच्या पाल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेवटी दत्त कारखाना व कुरुंदवाड नगर परिषदेच्या अग्निशामक गाड्या तात्काळ येऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आद्यापी नुकसानीचा आकडा समजू शकला नाही,घटनास्थळी दत्त कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाणा व अमर चौगुले यांनी भेट दिली आहे.
