डोळ्यांचे रोग म्हणजे फक्त दृष्टी्दोष नसून वेगवेगळे डोळ्यांचे आजार आहेत.
डोळ्यांचे आजार – काचबिंदू, मोतीबिंदू,ऑप्टिक नर्व्ह अशक्तपणा, बुबूळाचा अपारदर्शिपणा, डोळ्यावर मास येणे, डोळ्यात बुबूळावर फुल पडणे, रातांधळेपणा आणि या सर्वांमुळे दृष्टी्दोष उत्पन्न होतो.
डोळ्यांच्या आजारामध्ये आढळणारी लक्षणे –
डोळे रख रखने, डोळे लाल होणे, दुखणे, लांबचे न दिसणे, सूज येणे,पुढच्या वस्तू अस्पष्ट दिसणे, डोळ्यातून पाणी येणे डोळ्यात टोचणे हि लक्षणे दिसून येतात
अपथ्य (काय खाऊ नये )-
पापड, लोणचे, साधे मीठ, मसालेदार -तेलकट पदार्थ, फ्रिज मधील पदार्थ, तूर डाळ, नॉनव्हेज,शेंगदाणे, वाळलेले खोबरे, मुळा, अळू, हरभरा, पावटा, वरणा, बटाटा, फणस. दही, केळ, मध टोमॅटो.
पथ्य (खावे )-
मूग डाळ, खजूर, बदाम, दुधीभोपळा, पडवळ, दोडका, काकडी, बिट, गाजर, डाळिंब, पेरू, मोसंबी, संत्री, चिकू, ज्वारीच्या कन्या, राजगिरा लाडू, लिंबू,ज्वारीची भाकरी, भात, घेवडा, शेवगा, कारले,कांदा, लसूण, भेंडी, गवारी.दूध, लोणी, देशी गाईचे तूप.
आयुर्वेदिक औषधे व उपचार – सप्तामृत लोह, आमलकी रसायन,महात्रैफल्य घृत, त्रिफळा घृत /शतावरी घृत याने नेत्र तर्पण.
उपाय –
1) दररोज 5 बदाम व मनुके रात्री भिजत ठेवावे व सकाळी उठल्या उठल्या खावे.
2) बाहेरून आल्या आल्या डोळे स्वच्छ धुवून घ्यावेत.
3) आमलकी चूर्ण, नयनामृत लोह, साप्तामृत लोह, कास्य भस्म, पुनर्नवा चूर्ण, अकिक पिष्टी, गुडूची चूर्ण एकत्रित करून 2 चमचे,दिवसातून 2 वेळा गरम पाण्यातून घ्यावे.
4) दररोज ताजे गोमूत्राचे 2 थेंब डोळ्यात सोडणे यामुळे मोतीबिंदू व काचबिंदू कमी होतो.
5) त्रिफलांजन ड्रॉप्स दिवसातून 3 वेळा सोडणे.
6) जीवदया नेत्रप्रभा ड्रॉप्स हे देखील उत्तम कारगर आहे
7) गाजर मुबलक प्रमाणात खावे कारण त्यात व्हिटॅमिन “A” मोठया प्रमाणात असते.
8) डोक्यावरून खूप गरम पाण्याऐवजी, कोमट पाण्याने अंघोळ करावी, खूप गरम पाणी डोक्यावर घेण्यानेही डोळ्यावर त्याचा परिणाम होतो.
9) केसांना सतत केमिकल युक्त कलर देने व कठोर शाम्पू टाळावे कारण ते डोळ्यासाठी अपायकारक
आहे.
10) जागरण करू नये झोप वेळेवर घ्यावी.
11) दररोज 5-5 खजूर खावेत.
12) रात्री झोपताना तळपायाला खोबरेल तेलाने मालिश करावी, त्याने डोळ्यांना थंडावा मिळतो.
13) कापसाच्या पट्ट्या दुधात भिजवत ठेवाव्या व झोपतेवेळी डोळ्यावर ठेवून झोपावे, या ने ड्राय eye ची समस्या दूर होते.
14) गव्हाकुर रस देखील डोळ्यांच्या आरोग्यासाठी बेस्ट आहे.
15) खाऊच्या पानांचा रस दररोज 2थेंब डोळ्यात सोडल्यास उत्तम रिसल्ट मिळतो.
16) ॲक्युप्रेशर ची मदत घ्यावी.
17) पामिंग -तळ हातांनी डोळे शेकणे,ब्लीकिंग -डोळे मिचकावणे,दोन्ही बाजूना पाहणे,एकाचवेळी दृष्टी समोर व बाजूला वळवणे,नजर गोल -गोल फिरवणे,खाली आणि वर पाहणे,नाकाच्या अग्राकडे पाहणे,जवळ आणि दूर पाहणे हे व्यायाम प्रकार दररोज किमान 15 मिनिटे सकाळी व रात्री आवर्जून करावेत.
18) पंचगव्य नस्य दोन्ही नाकपुड्यात 2-2थेंब सकाळी व रात्री सोडावेत.
19) झोपताना बदाम तेल बेंबीत मुरवावे.
20) दररोज ओले खोबरे व नारळ पाणी देखील डोळ्याच्या आरोग्यासाठी चांगले आहे.
21) दररोज देशी गाईचे तूप आहारात घ्यावे
22) सकाळी आनवानी (चप्पल न घालता )गवतावर चालावे.
23) लोह चुंबकीय चिकित्सा देखील गुणकारक आहे.
24) गुलकंद देखील डोळ्यांचे आरोग्य उत्तम राखतो.
25) चक्रासन,हलासन,बकासन, सर्वांगासन हे योगाभ्यास नियमितपणे करावेत.
डॉ.ओंकार अशोक निंगनुरे
कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घोसरवाड.
संपर्क -9175723404,7028612340