इचलकरंजी शहरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने महायुती सरकारच्या विरोधात व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे विरोधात महात्मा गांधी पुतळा चौकामध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली हे राज्य सरकार हुकूमशाही सरकार आहे जो कालचा शिवसेनेच्या विरोधात निर्णय दिला आहे तो हुकूमशाही पद्धतीचा निर्णय दिला आहे येणाऱ्या लोकसभेमध्ये जनता यांना धडा शिकवेल यावेळी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष उपस्थित होते.महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता परिवर्तन गेल्या दीड वर्षापूर्वी झाले होते.महाविकास आघाडी सरकार कोसळून शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदे चाळीस आमदार घेऊन गुहाटीला गेले होते व त्यांनी तेथून परत आल्यानंतर भाजपशी हात मिळवणी करून हिंदुत्वाचा नारा देत पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन केले याच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी कोर्टात धाव घेतली होती.यावेळी न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेचा निर्णय घेण्याची आदेश केले होते.याची सुनावणी गेल्या नऊ महिन्यापासून सुरू होती याची सुनावणी काल करण्यात आली.यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनाच अपात्र ठरविण्यात आले.तसेच एकनाथ शिंदे हे खरेच शिवसेनेचे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि शिवसेना पक्ष त्यांचाच आहे असे निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला होता.याच्या निषेधार्थ इचलकरंजी शहरामध्ये आज महाविकास आघाडीतील सर्व राजकीय पक्षांनी महात्मा गांधी पुतळा चौकात मध्ये येऊन राहुल नार्वेकर व महायुतीतील भाजप शिवसेना राष्ट्रवादी यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.भाजप सरकार हे फोडाफोडी करणारा पक्ष आहे.त्यांच्याकडे गेला की वॉशिंग मशीन मध्ये घातल्यानंतर धून निघतो शिवसेनेच्या नेत्यांनी काळ्या फिती लावून राज्य सरकारचा व राहुल नार्वेकर यांचा निषेध
व्यक्त करण्यात आला.येणाऱ्या लोकसभेमध्ये जनताच त्यांना जागा दाखवून देईल 50 खोके एकदम ओके च्या घोषणा देण्यात आल्या यावेळी महाविकास आघाडीतील मदन कारंडे,राहुल खंजिरे,वैभव उबाळे,सदा मलाबादे व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.