अन्यायकारक ऊसतोडणी विरोधात प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांना सभासदांनी विचारला जाब
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अन्यायकारक ऊसतोडणी विरोधात माझ्या नेतृत्वाखाली प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयावर राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या वतीने आज धडक देऊन जाब विचारण्यात आला.काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत विरोधात मतदान केलेल्या सभासदांना हेतुपुरस्सर त्रास देण्याचा प्रकार कारखाना व्यवस्थापनाकडून घडत असल्याचे यावेळी निदर्शनास आणून दिले.तसेच याबाबत कारखाना प्रशासनास सक्त सूचना देऊन सर्व सभासदांचा ऊस वेळेवर तोडणी करून गाळपास नेणेबाबत तसेच पुढील हंगामाच्या ऊसाच्या नोंदी घेण्याचा आदेश देण्याबाबत प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांना सांगितले.याप्रसंगी राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या सर्व सदस्यांसह ऊस उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.