केंद्र सरकारने नवीन मोटार वाहन कायद्यात समाविष्ट केलेल्या काही कठोर तरतुदींच्या विरोधात देशभरातील वाहन चालक रस्त्यावर उतरले आहेत.राज्यात काही भागात तर या आंदोलनाला हिंसक वळणही लागले आहे. याचा विपरीत परिणाम रुग्णसेवेसह पुरवठा साखळीवर होऊन मोठ्या प्रमाणात गैरसोय होण्याची आणि बाजारपेठही ठप्प होण्याची भीती आहे.लोकशाहीत कुठल्याही प्रश्नावर चर्चा हाच सर्वोत्तम मार्ग असतो. त्यामुळं या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी सरकारने वाहन चालक, वाहन मालक यांच्या संघटनांशी चर्चा करून ही कोंडी तातडीने सोडवावी,अशी विनंती रोहित पवार यांनी ट्विटद्वारा केली आहे