शिरोळ / प्रतिनिधी
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने नेहमीच सभासद आणि कामगार बंधूंचे हित जोपासण्याचे काम केले आहे यामुळे सभासदांचा कारखान्याच्या वतीने विमा उतरवण्यात आला असून अपघातात मृत्यू झालेल्या सभासदांच्या वारसांना या विम्याच्या रूपाने आर्थिक सहाय्य देण्यास मदत होते.
दत्त कारखाना नेहमीच सभासद व कामगार बंधूंच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे प्रतिपादन चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले.शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सभासद बंधुंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन सर्व सभासदांचा अपघाती विमा उतरविण्यात आला आहे.
दुर्दैवाने एखाद्या सभसदाचा अपघाती मृत्यू झाला अथवा कायम स्वरूपी सर्व अवयव निकामी झाले.दोन डोळे किव्हा दोन हात/पाय निकामी झाले,तर विमा कंपनीकडून १ लाख रुपये व एक डोळा किंवा एक हात/पाय निकामी झाले तर ५० हजार रुपये इतकी विम्याची रक्कम मिळणार आहे.
सदर विमा पॉलिसी न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.इंचलकरंजी यांचे कडुन उतरवण्यात आली आहे. या पॉलिसी अंतर्गत आत्तापर्यंत एकुण ७९ सभासदांच्या वारसांना ७९ लाख देणेत आले आहेत. व एक पाय निकामी झालेल्या तीन सभासदाना ५० हजार असे एकुण ८० लाख ५० हजार एकुण ८२ सभासद व्यक्तीना देणेत आले.
शनिवारी सकाळी अपघाती मृत्यू आलेले कारखान्याचे सभासद संदिप रामचंद्र माने (शिरोळ) गोरखनाथ आण्णासो गायकवाड ( अर्जुनवाड) यांच्या वारसांना विमा कंपनीच्या प्रत्येकी एक लाख रुपयाचा धनादेश कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी कार्यकारी संचालक एम व्ही पाटील, संचालक दरगु गावडे, संजय उर्फ बसगोंडा पाटील जयसिंगपूरचे उद्योगपती अशोकराव कोळेकर कारखान्याचे शेअर्स विभागाचे परवेज मेस्त्री,मृत सभासदाचे वारस व न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. चे विमा प्रतिनिधी एकनाथ पाटील आदी उपस्थीत होते.