पंचगंगा साखर कारखान्याने एफ आर पी अधिक १०० रुपये द्यावेत अन्यथा ऊस वाहतूक रोखणार आंदोलन अंकुशचे कारखाना व्यवस्थापनास निवेदन

पंचगंगा साखर कारखान्याने एफ आर पी अधिक १०० रुपये द्यावेत अन्यथा ऊस वाहतूक रोखणार
आंदोलन अंकुशचे कारखाना व्यवस्थापनास निवेदन

देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने या वर्षीच्या ऊस गाळप हंगामाचा उसाचा दर एफ आर पी अधिक १०० रुपये करून ऊस उत्पादकांना द्यावा अन्यथा कारखान्याकडे येणारी ऊस वाहतूक रोखणार असल्याचे निवेदन आंदोलन अंकुशच्या वतीने कारखाना व्यवस्थापनास देण्यात आले आहे.

आपल्या भागातील सर्व साखर कारखान्यांनी चालू हंगामाचा उसाचा दर हा एफ आर पी च्या वर १०० रुपये देणार असे जाहीर केले आहे पण देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाण्याने फक्त उसाची एफ आर पी देणार असे घोषित करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमी दर देण्याचे धोरण घेतले आहे.

हे शेतकऱ्यांचे नुकसान करणारे असून तात्काळ एफ आर पी अधिक १०० रुपये असे ३३०० रुपये दर दिला जाईल असे प्रसिद्धी पत्रक काढून शेतकऱ्यांना न्याय द्यावा याबाबत
कारखाना व्यवस्थापनास फोनवरून सूचना केली पण कारखान्याने याबाबतीत नव्याने परिपत्रक काढले नाही म्हणून सदर मागणीचे निवेदन द्यावे लागत आहे.

उद्यापर्यंत पंचगंगा कारखान्याकडून ३३०० रुपये दर देणार आहे असे परिपत्रक प्रसिद्ध न केल्यास कारखान्याकडे येणारी ऊस वाहतूक आंदोलन अंकुश च्या वतीने रोखणार आहोत. त्यामुळे ऊस दराबाबत कारखाना व्यवस्थापनाने तात्काळ कार्यवाही करावी आणि शेतकरी हित जपावे अशा आशयाचे निवेदन कारखाना व्यवस्थापनास देण्यात आले.

तसेच पंचगंगा साखर कारखान्याच्या ऊस वाहतुकीस पोलीस संरक्षण देऊ नये असे निवेदन विविध पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहे.यावेळी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे शिरोळ तालुका अध्यक्ष दीपक पाटील धनाजी माने संभाजी निंबाळकर आदी उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!