बेडकिहाळ येथे रथोत्सव निमित्त विशेष व्याख्यानाचा कार्यक्रम
आपली शाळा म्हणजे केवळ चार भिंतीची शाळा नसून एक पवित्र विद्या मंदिर आहे.एक माणूस घडविण्याचे पवित्र स्थान आहे.येथूनच आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने चालना व गती मिळते.सध्या युवक युवती मोबाईल,संगणक,इंटरनेटच्या मागे लागून आपले जीवन नको त्या दिशेने नेत असल्याचे चित्र आहे.
पण खऱ्या अर्थाने आपले जीवन घडविण्यासाठी आपल्या आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टाचे चीज करायचे असेल तर आपल्या क्षणिक सुखासाठी त्यांची मान कोणत्याही परिस्थितीत समाजासमोर झुकू देऊ नका आणि हे आपले आद्य कर्तव्य आहे.असे मत व्याख्याते वसंत हंकारे यांनी व्यक्त केले.
बेडकीहाळ येथील श्री १००८ पार्श्वनाथ भगवान यांच्या १११ व्या रथोत्सवानिमित्त लठ्ठे शिक्षण संस्थेच्या बीएस पदवीपूर्व महाविद्यालयाच्या देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या “युवा पिढींचे आई-वडिलांच्या प्रति आद्य कर्तव्य “या विशेष व्याख्यान कार्यक्रमा प्रसंगी ते मार्गदर्शनपर बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जीनमंदिर मॅनेजिंग कमिटीचे अध्यक्ष संदीप पाटील हे होते.यावेळी वसंत हंकारे म्हणाले झांसीची राणी लक्ष्मीबाई,सावित्रीबाई फुले,ताराराणी,कित्तूर राणी चन्नम्मा,याच बरोबर राष्ट्र व समाज घडवणाऱ्या महान व्यक्ती व महिलांचा इतिहास जाणून घ्या,आपल्या क्षणिक सुखासाठी जीवन बरबाद करून घेऊ नका.
तर जीवन जगताना खचून न जाता आई वडिलांशी चर्चा करा,सद्या जगण्यासाठी अनेक वाटा खुल्या आहेत. आपल्या आई-वडिलांसह गुरुजनांच्या संस्कारातून घडलेले हे जीवन आदर्श समाज घडविण्यासाठी व्यथित करा.संकटांना पायाखाली घालून सामोरे जाण्याची जिद्द निर्माण करा.
आपल्याला यश नक्कीच येईल.विशेष म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आपल्या आई-वडिलांची मने दुखावू नका तसेच त्यांना समाजासमोर मान खाली घालन्याची वेळ येऊ देऊ नका.
याप्रसंगी हंकारे यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेले काही पालक व विद्यार्थिनींनीची प्रत्येक्ष भेट घडून आणात यांच्यातील एक आप्त नाते संबंधाचा भाउक क्षण सर्वांच्या समोर दाखवून दिला,यावेळी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले.
या कार्यक्रमास प्राचार्य एम एस कट्टी,पी के पी एस चे अध्यक्ष पासगौडा पाटील,तात्यासाहेब खोत,तात्यासाहेब चौगुले, प्रकाश गोरवाडे,पद्माकर पाटील,प्रवीण पाटील,सागर जठार,विजय देसाई,अरुण शेट्टी,सुभाष जगदेव,संजय पाटील,अनिल मालगत्ते, रावसाहेब हिरुकुडे,रावसाहेब भोजेपाटील,सी एम पाटील यांच्यासह जैन मंदिर कमिटीचे सदस्य, व वीर सेवादलाचे सदस्य,वीर महिला मंडळाच्या सदस्य प्राध्यापक शिक्षक,व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जे ए कांबळे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार वीर सेवादल मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी मानले.