१०८ कुंडीय श्री गणपती महायज्ञ सोहळ्यानिमित्त मुख्य चार उपदिशा , नवग्रहांच्या यज्ञकुंडांची पुजा

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी येथील नदीकाठावर श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती व श्री पंचगंगा वरद विनायक मंदिर भक्त मंडळाच्या वतीने सुरु असलेल्या १०८ कुंडीय श्री गणपती महायज्ञ सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी महागणपती वरदविनायक,गो – माताची विधीवत पुजाअर्चा ,मंञ पुष्पांजली करत यज्ञ अग्नी ज्योत प्रज्वलीत करण्यात आली.याचबरोबर नवग्रह , मुख्य चार उपदिशांची पुजा करुन नवग्रहांच्या यज्ञकुंडांची पुजा करण्यात आली.
प्रारंभी सकाळी ८ वाजता १०८ कुंडीय महायज्ञास १०८ दांपत्यास सोवळे नेसून बसवण्यात आले होते.श्री श्री १०८ सितारामदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञाचारी पंडित चिरंजीवी शास्त्री यांच्यासह महंतांनी शास्त्रीय पद्धतीने महामंञ उच्चारत महायज्ञास तुप ,तीळ यासह यज्ञ हावन सामग्रीची आहुती देत वैदिक पद्धतीने महायुज्ञ विधी पार पडला.सकाळी ८ ते ११ व दुपारी १२ ते ३ या कालावधीत महायज्ञ विधी पार पडला.यावेळी संत महंतांच्या दिव्य सानिध्यात भाविकांच्या उपस्थितीत महायज्ञ विधी ,आरती व महाप्रसाद वाटप असा धार्मिक विधी सोहळा अमाप उत्साहात पार पडला.सायंकाळी पाच वाजता पुज्य कैलासचंद्र जोशी ( जोधपूर )यांचे गणपती महापुराण महिमा प्रवचन कार्यक्रम पार पडला.या धार्मिक विधी सोहळ्यास वस्ञोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी , गोविंदराव बजाज , बाळासाहेब जांभळे ,व्दारकाधिश सारडा ,श्यामजी काबरा , गोविंद सोनी ,शिवबसव खोत ,शिवम केशरवाणी , गजानन स्वामी, प्रकाश कलागते , यांच्यासह श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती, श्री पंचगंगा वरद विनायक मंदिर भक्त मंडळ ,जय जगदंबा सत्संग मंडळ ,त्यागी भवन मंडळ ,माय फौंडेशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान ,या १०८ कुंडीय श्री गणपती महायज्ञ सोहळ्यानिमित्त भाविकांना विघ धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी लाभत असून भाविकांमध्ये अमाप उत्साहाचे वातावरण दिसत आहे.

चौकट…
वृंदावन सूरदास भक्त ग्रुपच्या वतीने महायज्ञ शाळेच्या मंडपात अखंड २४ तास नामजप सुरु ठेवण्यात आला आहे. मंगळवारी १०८ कुंडीय महायज्ञाची व्यवस्था श्री लक्ष्मी नारायण महिला मंडळाने चांगल्या पद्धतीने पार पाडली.या महायज्ञ सोहळ्यासाठी स्वयंसेवक व महापालिकेच्या आरोग्य विभागाचे चांगले सहकार्य लाभत आहे.

Spread the love
error: Content is protected !!