शिरोळचा जिव्हाळा ‘आपलं शिरोळ’ सेल्फी पॉईंट – निशिकांत प्रचंडराव

 

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ शहरातील नागरिकांचा आपल्या शहराबरोबर जिव्हाळा राहावा यासाठी आपलं शिरोळ या सेल्फी पॉइंटची निर्मिती करण्यात आली आहे याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिरोळ नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी केले.
शहरातील मटण मार्केट शेजारील चौकात शिरोळ नगरपरिषदेच्या वतीने आपलं शिरोळ हा सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे याचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी करण्यात आला यावेळी ते बोलत होते शिरोळ तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अविनाश उर्फ पांडुरंग माने आणि ग्राहक संघटनेचे सुभाष माळी यांनी शिरोळच्या वैभवात भर घालणारा असा आपलं शिरोळ या नावाने सेल्फी पॉईंट करण्यात आल्याबद्दल पालिकेचे प्रशासक व अधिकारी आणि कर्मचारी मुख्याधिकारी यांचे शहराच्या वतीने आभार मानले
माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील युवानेते पृथ्वीराजसिंह यादव माजी सरपंच गजानन संकपाळ माजी नगरसेवक पंडित काळे रावसाहेब पाटील मलिकवाडे विजय आरगे संजय माने दिगंबर जाधव अण्णासो पुजारी खंडेराव हेरवाडे अभिजीत माळी अभिजीत कोळी रवींद्र महात्मे उत्तम भोसले प्रभाकर गाडगीळ पालिकेचे अधिकारी साहिल मकानदार, अमन मोमीन, श्रीधर डुबुले, संदीप चुडमुंगे चंद्रकांत पाटील मल्लिकार्जुन बल्लारी विनोद बिराणे भानुदास कांबळे प्रकाश माने यांच्यासह अधिकारी व कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Spread the love
error: Content is protected !!