शरद कृषि महाविद्यालयाचे कृषिदूत देणार खिद्रापूरच्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

खिद्रापूर / प्रतिनिधी

शरद कृषि महाविद्यालय जैनापुर ता शिरोळ जि. कोल्हापुर येथील चतुर्थ वर्षातील विदयार्थी त्यांच्या अभ्यासक्रमानुसार कृषिदूत म्हणून प्रशिक्षणासाठी खिद्रापूर गावामध्ये दाखल झाले असुन ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. हे कृषिदूत शेतीविषयक माहीती, कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाबाबत जनजागृती करणे,तसेच शेतकऱ्यांना माहितीपर प्रात्यक्षिक करून दाखवणार आहेत.यावेळी सरपंच सौ.सारिका कदम,उपसरपंच सौ.पूजा पाटील, तसेच ग्रामपंचायत सदस्य पंचाक्षरी कोष्टी व दयानंद खानोरे ,श्री केतन स्वामी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कृषिदुतांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी कृषिदूत प्रतीक बडधे,रोहित हराळे,धवलराज जगदाळे,पंकज केवारे,पवन कोळी,श्रेयस कुलकर्णी उपस्थीत होते.या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.एस.जे पाटील व उपप्राचार्य व कार्यक्रमाचे प्रमुख प्रा.एस. एच. फलके, कार्यक्रम समन्वयक डॉ. आर.टी कोळी व कार्यक्रम अधिकारी प्रा. ए.एस माळी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Spread the love
error: Content is protected !!