कवठेगुलंदब / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत घेण्यात आलेल्या डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम विज्ञान प्रज्ञाशोध शिरोळ तालुकास्तरीय परीक्षेत कुमार विद्या मंदिर कवठेगुलंद शाळेने घवघवीत यश संपादन केले.
दि.३ डिसेंबर २०२३ रोजी सदर स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या होत्या.या परीक्षेसाठी माध्यमिक व प्राथमिक शाळा सहभागी झालेल्या होत्या.नुकताच निकाल जाहीर करण्यात आला.त्यामध्ये कुमार विद्या मंदिर
कवठेगुलंदच्या इयत्ता ६ वीचे ९ विद्यार्थी सहभागी झाले होते.सर्वच विद्यार्थी उतीर्ण झाले असून सोहम सुशिलकुमार पडसलगे, आर्यन गणेश कागले,सुफीयान जमीर वाळवेकर हे ३ विद्यार्थी जिल्हास्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
तर गौरी प्रविण पाटील, महंमदसादअझरूद्दीन मलंग फकीर,शाहिद मुजमिल मलंगफकीर,सिध्दी नितीन शिंदे, अनिस यासीन मलंगफकीर, श्रीअसा श्रीकांत जगताप हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
सदर विद्यार्थ्यांना चंद्रकांत राजाराम नवटे,सविता श्रीकांत उपाध्ये यांचे मार्गदर्शन लाभले.तर गट शिक्षण अधिकारी भारती कोळी, शिक्षण विस्तार अधिकारी नारायण पाटील,केंद्र प्रमुख संदीप कांबळे,
मुख्याध्यापक राजू दिवटे यांचे प्रोत्साहन लाभले.तसेच दिपक कदम,वैशाली आवटी,मुकुंद कुंभार,शीलप्रभा माळी,लता कांबळे मॅडम यांचे सहकार्य लाभले.