नवे-दानवाड येथे प्रभू श्री राम अक्षता कलशाचे जल्लोषात स्वागत

कुरुंदवाड / प्रतिनिधी

नवे-दानवाड ता.शिरोळ येथे प्रभू श्री राम अक्षता कलशाचे जल्लोषात स्वागत झाले.कलश आणि वेशभूषेतील श्री राम-सीता यांची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.नागरिकांनी टाळ मृदंगाच्या निनादात

 

आणि श्रीरामाच्या जयघोषात भव्य मिरवणूक काढली होती. ठीकठिकाणी फुलांचा वर्षाव देखिल करत मंगल अक्षता कलशाचे स्वागत केले.महिलांनी फुगड्याचे फेरे घेत आनंद साजरा केला.दानवाड येथे समाजबांधवांनी

 

राम-सिता,लक्ष्मण-भरत,हनुमान यांच्या वेशभूषा साकारलेल्या मुला-मुलींच्या मिरवणुकीसाठी अश्वारूढ रथ तयार केला होता.हुबेहूब वेशभूषा पाहून नागरिक भारावले होते.मिरवणूक मार्गावर फुलांच्या रांगोळ्या

 

घातल्या होत्या.हलगी,वारकरी संप्रदाय टाळ्यांच्या गजरात व धनगरी ढोल या सर्व वाद्यासह असंख्य गावकऱ्यांच्या सहभागाने श्री राम अक्षता कलक्षाची मिरवणूक फुलांच्या वर्षावात पार पाडली.

 

यावेळी श्री रामरक्षा पठण करून आरती करून प्रसाद वाटप करण्यात आला.या मिरवणुकीमध्ये सर्व बाल गोपाळ अबाल वृद्ध भाविक भक्तांनी सहभाग घेतला होता. मिरवणूक मारुती मंदिर पासुन गाव प्रदिक्षना काढण्यात आली.यावेळी गावातील मान्यवर,ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!